२३० पुराणनिरीक्षण. पुराणांत आढळत नाही. यावरून इ० स० ५६० - ६०० पर्यंत वायु, मत्स्य, विष्णु व भागवत याला सद्य: स्वरूप आलेले असावें. इ० स०७०० च्या पूर्वीतर तें खात्रीनेंच आले असावें. यास प्रमाण त्या वेळच्या समजु- तीवरूनच मिळतें. पहा. या पुराणांच्या सद्यस्वरूपकर्त्यांची समजूत, तेव्हां भारतीय युद्धापासून कैलकिल यवनांच्या अखेरपर्यंत अगर आपल्या वेळे पर्यंत किती वर्षे झाली असावीत अशी समजूत होती, हें आपण पाहूं. याच सद्यःस्वरूपकर्त्यांच्या वेळीं मागची सर्व पौराणिक कालगणना बदलून आपल्या कल्पनेप्रमाणे ती जुळविण्यासाठी मोठी केलेली असावी, हें कळून येईल. याच वेळी ही संख्या अशी ठरविण्यांत आली असावीः १००० १३८ ३६२ १०० १३७ ११२ ४५ बार्हद्रथ प्रद्योत शिशुनाग नंद मौर्य शुंग काण्व आंध्र ४५६ (४११वायु) मधील राजे १३९९ कैलकिल ३७४९ १०६ ३८५५ याप्रमाणे वरील पुराणांच्या सद्यःस्वरूपकर्त्या वेळीं भारतीय युद्धापासून आपल्या वेळेपर्यंत ३७५५ वर्षे गेलीं, अशी समजूत असावी. म्हणजे तेव्हां इ०स० ७५३ चा काळ येतो. मधील राजांचा काळ कदाचित् १०९९ असेल तर मात्र ह्रीं एकंदर वर्षे ३५५५ होतात; व या वेरजेनें इ० स० ४५३ च्या सुमारचा काळ येतो. कांहीं असो. पुराणांतील कैल-
- मत्स्यपुराणांतील यामधील राजांच्या संख्यांची बेरीज केली तर ती
१०५९ होते. जसें ८७ + ५४ + ३८० + १०८ + ३११+ ५२ + ६७ = १०५९ व यांत आणखी ४० वर्षे राहिली असतील ( एकाद्या कारकीर्दीची). यावरून १०९९ च बरोबर दिसतें; मौनांचे ३०० सोडून दिले तर वायूप्रमाणें १२९९ वर्षे होतात !