पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३४ पुराणानिरक्षिण. व यानें वरील लेखकापासून ' महापद्मापासून आंध्रांच्या आतापर्यंत ८३६ वर्षे झालीं, ' हें विधान चुकीच्या भाषांतररूपानें उतरून घेतलें ! १ 6 महापद्माभिषेकात्तु जन्म यावत्परीक्षितः । एकवर्षसहस्रं तु ज्ञेयं पंचाशदुत्तरम् । , ( ५ ) नंतर विष्णुपुराणानें ' एकवर्षसहस्रं तु ज्ञेयं पंचाशदुत्तरम् ' याचा अर्थ १०५० किंवा पाठभेदानें १०१५ घेऊन ' परीक्षितच्या जन्मापासून नंदांच्या अभिषेकापर्यंत १०१५ - किंवा १०५० वर्षे झाली, ११०० कांहीं नाहींत असें सप्तर्षिपरिगणनेच्या भाषांतरद्वारें ठरविलें ! ( ६ ) भागवतानें याचीच कॉपी केली व १०० वर्ष वाढविलीं तीं कां हैं मात्र वरोवर समजत नाहीं ! हा नुसता लेखक-प्रमादही असेल ! ( ७ ) त्यानंतर इ० स० ५५० - ७०० च्या सुमारास सर्वही पुरा- णांस कैनकिलयवनांनंतर सद्यः स्वरूप मिळून त्या वेळच्या ३६००- वर्षातून आंध्रांतापर्यंतचा २३५० वर्षाचा* ( सर्व बेरजा करून आलेला ) काळ वजा करून आंध्रांतापासून या यवनांपर्यंत १३९९ वर्षे ठरविण्यांत आलीं ! या वेळीं, 'कलिप्रारंभ इ० स० ३१०२ सालीं सुरू झाला ' अशी कल्पना प्ररूढमूल झाली होती. म्हणून या वेळच्या संस्कर्त्याने सर्व वर्षांच्या बेरजा करून त्याच्या वेळीं प्रचलित काळी आंध्रांअखेरपर्यंतचीं २३५० वर्षे वजा करून-मधील राजांचा काळ १३९९ वर्षे ठरविण्यांत आला !

  • ' आंध्रांच्या अंतापर्यंत सप्तर्षि २४ वें नक्षत्रानें येतील ' या परंपरेचें हें

चुकीचें भाषांतर होय ! २३०० हून अधिक व २४०० हून कमी इतका काळ बेरेजा करून ठरविण्यांत आला ! ! ८३६ + ८३६ = १६७२ चे ऐवज बेरजांनी आंध्रांतांपर्यंत २३५० वर्षे या संस्कर्त्याने ठरविली !!! सगळाच घोटाळा ! ! !