पुराणनिरीक्षण. या उताऱ्यावरून, सहा जणांकडून ( त्रय्यारुण वगैरे ) सहा पुणे, रोमहर्षणापासून चार, व्यासांपासून सात, याप्रमाणें १७ पुराणें व्यासाश्रमांत शिकून नंतर उग्रश्रवा शुक्राकडून व्यासाज्ञेनेंच भागवत शिकता झाला हैं कळून येईल. याही हकीकतीवरून व्यासांनीं १८ पुराणे केलीं हैं कळून येतें; व ही जुनी परंपरा दिसते. १० - रोमहर्षणाचा पुत्र उग्रश्रवा म्हणून होता. रोमहर्षण अगर लोमहर्षण आपल्या पुत्रास म्हणतो. (पा.पु. ११४ ):-- वेदव्यासान्मया पुत्र पुराणान्यखिलानि च । तवाख्यातानि प्राप्तानि मुनिभ्यो वर विस्तरात् || सूतांचें कर्तव्य. धर्म एष हि सूतस्य सद्भिर्दृष्टः सनातनः । देवतानां ऋषीणां च राज्ञां चामिततेजसाम् ॥ वंशानां धारणं कार्यं स्तुतीनां च महात्मनाम् ॥ पद्मपुराण, १-१-२८ देव, ऋषि व मोठाले राजे यांच्या वंशाचें व मोठ्यांच्या स्तुतींचें धारण करणें हें सूतांचें कर्तव्य होतें. सूत, मागध व बंदी यांची कर्तव्यें जैमिनि अश्वमेधपर्वात याप्रकारें सांगितली आहेतः सूता ये च पुराणस्थानुच्चरन्ति नृपान् सदा । प्रेतलोकगतान् शूरान्वर्णयंति च मागधाः ॥ ४० ॥ वर्तमानान् नृपान्सम्यक् ये तु संग्रामकारिणः । वर्णयंति प्रबंधैर्ये बंदिनस्ते ( प्रकीर्तिताः ) ॥ ४१ ॥ जै. अश्वमेधपर्व, अ० ५५.
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२५
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही