पुराणनिरीक्षण. या श्लोकांचा खरा अर्थ काय आहे हैं आम्ही मार्गे दाखविलेलेच आहे. सप्तर्षि मघांत भारतकाळीं होते ! म्हणजे १० वे नक्षत्रांत होते ते आंध्रां- अखेर २४ वे नक्षत्रीं येतील ! ! ! म्हणजे ( २४-९ = १५ ) सुमारें १५०० वर्षे मध्यंतरी जातील. हा अर्थ सोडून देऊन ' चतुर्विंशे ' अर्थ २३०० वर व २४०० पेक्षां कमी-अत एव २३५० याचा असा करून त्यांतून ८५० वर्षे वजा करून १५०० वर्षे हा काळ नंदांपर्यंत ठरविण्यांत आला ! ! ! असो. पुराणांतून एकंदर तीन परंपरा आढळतात:- ( १ ) परिक्षितापासून नंदांपर्यंत ८३६ वर्षे व तेथून आंध्रांतापर्यंत ८३६ वर्षे मिळून आंध्रतापर्यंत १६७२ वर्षे. २ ( २ ) पुराणांत बार्हद्रथवंशास १००० वर्षे + प्रद्योतवंशास १३८+ शिशुनागवंशास ३६२ वर्षे अर्शी मिळून नंदांपर्यंत १५०० व तेथून आघ्रांतांपर्यंत ८५० वर्षे याप्रमाणे २३५० आंध्रतापर्यंत ठरविण्यांत आली ! तीं वरील श्लोकाच्या चुकीच्या अर्थामुळे होय. = ( ३ ) कैनकिलयवनांनंतर त्या वेळच्या लेखकाच्या वेळी कलीची जवळ जवळ ३७००-३८०० वर्षे झाली अशी समजूत असावी. तेव्हां त्यानें ३७००-३८०० मधून २३५० वर्षे वजा करून १३५०-१४५० वर्षे मधील राजांस दिली ! मधील राजांस १३९९ व कैनकिलांस १०६ वर्षे याप्रमाणें ( २३५० + १३९९ + १०६ = ) ३८४५ वर्षे त्यानें दिली आहेत–त्यावरून हा लेखक इ० स० ( ३८४५ - ३१०२ =) ७४३ च्या सुमाराचा असावा. हाच पुराणाचा शेवटचा संस्कार ! कोणी मधील काळ १०९९ धरितात; तर त्या वेळचा लेखक ( १३५० + १० ९९ + १०६ = ) ३५४५ कलिकालचा ठरतो. म्हणजे तो ४४३ इ० स० च्या सुमारचा असावा. हाच दुसऱ्या संस्कर्त्याचा काळ असावा. =
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२५१
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही