पुराणानरीक्षण. “ Anand means one hundred Minous nine ie ninety one or ninety, the deduction of which numbers from the Vikrama era justifies chandd'ss chronology." अद्यापि मेवाडमध्ये पूर्वी तेथें दोन विक्रम संवत् चालू असल्याविषयींच्या परंपरा आहेत. टॉडनें ही गोष्ट हारावतीच्या हकीकर्तीत दिलेली आहे; पण तेथें या दोन संवतमधील अंतर त्याने ९० वर्षे दिलेलें नसून १०० वर्षे दिलेले आहे. २४० चंदानें रासोमध्यें दिलेले काळ काल्पनिक नसून अ-नंद विक्रम संव- त - चे आहेत; अनंद-विक्रम संवत् चंदानें प्रवृत्त केल्यासारखा दिसतो. इ. स. च्या बाराव्या शतकांत राजपुतान्यांत दोन विक्रमसंवत् चालू होते. एक सनंद विक्रमसंवत्, ज्याचा प्रारंभ इ. पु.५७ हा होता तो ; व दुसरा अ-नंद विक्रमसंवत्-ज्याचा प्रारंभ पहिल्याहून ९०-९१ वर्षीनी अर्वाचीन तर ठरविण्यांत आला. तो ( A the neaum, June 9 th, 1888 पहा ). चंद कवि पृथ्वीराज ज्या वर्षी जन्मला त्याच वर्षी जन्मून तो मेला त्याच वर्षी मेला असें म्हणतात. चंदानें दिलेले काळ चुकीचे व काल्पनिक नसून ते अनंद विक्रम संवतचे आहेत. असो. चंदाच्या ग्रंथांतील पहिल्या पुस्तकांतील ३५६ व्या रूपकावरून एक गोष्ट लक्षांत येते; ती ही कीं युधिष्ठिरागसून ( विक्रमापूर्वीच्या अनंद ) विक्रमापर्यंत १११५ वर्षे झालीं; त्यांत ९०+९१ वर्षे मिळविलीं तर १२०५ - ६ हा विक्रमसंवत् होय ! यांत ५७ इ. पू. असल्यामुळे तो वर्षे मिळविलों तर इ. पू. १२६२+६३ हाच युधिष्ठिराचा म्हणजे भारतीय युद्धाचा काळ येतो. चंदाची भाषा मला नीट कळली नाहीं; तात्पर्य हेंच दिसतें. शिवाय, मिश्रकृत शाहनामा नांवाचा एक ग्रंथ आहे. तो हिंदीत असून त्यांत युधिष्ठिरापासून शाहअलमपर्यंत राज्यपरंपरा व राज्यकाळ दि-
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२५५
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही