पुराणनिरीक्षण. सारांश चंदाचा अर्थ असा दिसतो की युधिष्ठिरापासून खऱ्या विक्रमा- पर्यंत जितका ( १११५ +९० ९१ ) काळ गेला, तितकाच काळ, विक्रमापासून पृथ्वीराजाच्या जन्मापर्यंत ( १११५ +९०-९१ ) गेला. असो. या दोन्ही परंपरांवरून इ. पू. १२६३ हाच भारतीय युद्धाचा काळ ठरतो. २४२ -- मिश्र याच्या शाहानाम्यांत जी २४५४ वर्षांची परंपरा दिलेली आहे तिलाच जुळती अशी दुसरी एक परंपरा--पण चुकीनें दिलेली- कै. गोडबोलें यांच्या ' अर्वाचीन कोशां' त दिलेली आहे:- पृ. २२० युधिष्ठिरापासून पृथुराजापर्यंत हिंदु राजांची बादशाही ४२१४ वर्षेपर्यंत भरतखंडांत निर्बंध चालली होती" ( हिंदुस्थानचा हस्तलिखित इतिहास ) ही ४२९४ वर्षांची परंपरा कलीपासून अगर युधिष्ठिरापासून पृथु- राजापर्यंत जी धरिली आहे ती तशी न धरितां, ती कल्पापासून धरिली म्हणजे ही परंपरा मिश्राच्या शहानाम्याच्या परंपरेशी जुळते. पृथुराजाच्या अंतापर्यंत ४२९३ वर्षे संपून ४२९४ वे सुरू होतें एवढें खरें; पण ही वर्षे कल्पाच्या प्ररंभापासून झालीं, कलीच्या प्रारंभापासून नव्हे. ४२९३ कल्यापासून पृथुराजा अखेर. १८३९ कल्यापासून भारतीय युद्धापर्यंत. २४५४ भारतीय युद्धापासून पृथुराजाच्या अंतापर्यंत (११९१इ.स.) सारांश, ४२९३ वर्षे संपून ४२९४ वें वर्ष जे इ. स, ११९१ मध्यें चालू होतें तें कल्पारंभापासून होय. याविषयीं पुढें खुलासा होईल.
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२५७
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही