पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४७ प्रकरण तिसरें. ३ दामोदर ( दुसरा ) ४ हुष्क जुष्क कनिष्क ५ अभिमन्यु प्रतापादित्य इत्यादि ते इ. स. ३०-४० पर्यंत केव्हां तरी होऊन गेला असावा हें आम्ही वर दाखविलेलेंच आहे; यावरून माझें असें मत आहे कीं गोनर्दादि (४ + ३५ + ८ + ५ मिळून ) बावन्न ( ५२ ) राजे काश्मीरावर राज्य केल्यानंतर इ. स. च्या सुमारास प्रतापा- दित्य काश्मीराच्या गादीवर बसला. हा कल्हणाच्या पूर्वीच्या लोकांच्या मताप्रमाणें शकारी विक्रमादित्याचा संबंधिक असूं शकेल. सारांश, प्रतापा- दित्य इ. स. च्या सुमारास काश्मीरच्या गादीवर बसला असावा; व तो अभिमन्यूनंतर लगेच आला असावा. असो. आपणांस काश्मीरी इतिहा साच्या कालानुक्रमाशीं विशेष संबंध नाहीं. फक्त भारतीय युद्धाचा काळ इ. पू. १२६३ वर्षे असूं शकेल की नाही येवढेंच काश्मीरी इतिहासाव रून बघावयाचें आहे; व त्याची शक्यता कल्हणाच्या दोन्ही प्राचीन परंपरांवरून शात्रीत होते. > युगें व मन्वंतरें. यांची मूळची आपल्या लोकांत काय कल्पना होती, ती पुढे कसकशी बदलत गेली, व त्यामुळे कालगणना पद्धतीत काय काय घोटाळे उत्पन्न झाले व एकंदरीत विचार करितां आपली कालगणनापद्धति बुडवायाला कोण कारणीभूत झाले याचा विशेषेकरून यापुढें विचार कर्तव्य आहे. महाभारतांत कोठेंही अनुक्रमें करून ४०००, ३०००, २०००, व १००० वर्षाच्यापेक्षां अधिक वर्षाच्या युगांचें वर्णन आलेले नाहीं. क्वचित् ठाई संध्या व संध्यांश मिळून २००० वर्षे अधिक म्हणजे चारों युगें मिळून १२,००० वर्षांची धरिली आहेत. अर्वाचीन पौराणिक लेखकांनी ही सार्धी मनुष्यांचीं वर्षे ' देवांची वर्षे! बनविली व चारी युगांची संख्या अनुक्रमें याप्रमाणे ठरविलीः -