२४८ कृतयुग त्रेतायुग द्वापरयुग कलियुग 1 = = = पुराणनिरीक्षण. (४००० X ८०० ) x ३६० ( ३००० X ६०० ) x ३६० ( २००० X४०० ) x ३६० ( १००० X२०० ) x ३६० महाभारताचें सद्यःस्वरूप इ. पू. १०० च्या सुमारास प्राप्त झाले असें रा. ब. वैद्यांचें मत आहे; व पाश्चात्यांचे ही मत अलीकडे असें झालें आहे कीं, खिस्ती शकाच्या प्रारंभापासून किंवा त्याही पूर्वीच भारताला सद्यःस्वरूप प्राप्त झालेलें होतें. तेव्हां इ. पू. १०० च्या सुमारास 'देवी वर्षाची ' पद्धति व १००० वर्षांच्या पेक्षां अधिक मोठें कलियुग प्रचालत नव्हतें. कारण, कोठेंही महाभारतांत तसा उल्लेख नाहीं. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. महाभारताच्या सद्य: स्वरूपकत्यास फक्त ‘ मानवी वर्षे ' च माहीत होतीं, व ते कलियुग १००० किंवा १२०० मानवी वर्षांचेंच मानीत होते. यावरून असे सिद्ध होतें की भारतीय युद्धापासून १००० - १२०० वर्षीनंतर महाभारताला सद्यःस्वरूप मिळालें; व सद्य: स्वरूपकर्त्यांच्या पुढें, भारतीय युद्धापासून आपल्या वेळेपर्यंत १००० - १२०० वर्षे झाली अशी परंपरा आलेली असावी. भारतीय युद्ध झाले तेव्हां नुकतेंच कलियुग लागले असा भारतांत ( मूळचा ) उल्लेख पाहून त्या ( भारताच्या व पुराणांच्या ) अर्वाचीन लेखकांनी ठरविलें कीं तोच कलि अद्यापि चालू असेल. याविषयीं पुढें अधिक विचार करूं. चंद्रगु- साच्या वेळेस भारतीय युद्धापासून ९५१ वर्षे झाली होती अशी परंपरा पुराणांवरूनच कशी निष्पन्न होते हैं दाखविलेलेंच आहे. त्यानंतर ५०-७५ वर्षांनी, म्हणजे भारतीय युद्धानंतर १००० वर्षे झाल्यानंतर १००० वर्षांच्या कलियुगाची पद्धति ठरली असावी, किंवा त्याहीनंतर १५०-२०० वर्षांनी गर्ग-पतंजलि काळीं-ही पद्धति ठरली असावी. सारांश, १२६३ इ.
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२६३
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही