२५० पुराण निरीक्षण. lunar month, and a knowledge of them is clearly implic ed in the Rigveda. " सारांश, सूर्यमान व चांद्रमान यांची संगति करण्यासाठी पूर्वी पांच वर्षीची गणना करून त्यास युग म्हणत. हे पांच वर्षांचें युग ३६६ दिवसां- च्या ५ नाक्षत्र वर्षांचे बनलेलें असे. वेदांगज्योतिषकाळी हें पंचसंवत्सर- मय युगच होतें. वेदांगज्योतिषाचा काळ प्रो. आर्च डीकन प्रॉट् व बेंटले यांच्या मतें इ. पू. ११८१ च्या सुमारचा आहे. बौधायन, गर्ग व वेदांग- ज्योतिप्रकार यांनीं दक्षिणोत्तरायणांची स्थिति सारखीच दिली आहे. तेव्हां हे सारे इ. पू. ११८१ च्या सुमारचे होत. वेदांगज्योतिषांत माघशुक्लप्रवृत्तस्य पौषकृष्णसमापिनः । युगस्य पंचवर्षस्य कालज्ञानं प्रचक्षते ॥ " असे म्हटलें आहे. यावरून इ. पू. ११८१ च्या सुमारास पांच वर्षांचें युग चालू होतें हैं कळतें. ब्रह्मगुप्तानें या पंचवर्षात्मक युगाचा याप्रकारें उल्लेख केलेला आहे:- - युगमाहुः पंचाब्दं रविशशिनोः संहितांगकारा ये । अघिमासावमरात्रस्फुटतिथ्यज्ञानतस्तदसत् || २ || ब्रह्मसिद्धांत, अ. ११. प्राचीन ज्योतिषसंहिताकार व वेदांगकार यांनीं पांच वर्षांचें युग सां- गितले आहे असे ब्रह्मगुप्त म्हणतो. प्राचीन काळी गर्गपराशरादि १८ ज्योतिषसंहिता होत्या. गर्गाने पांच वर्षांचेंच युग धरिलें आहे. पंच- सिद्धांतिकेंत वराहमिहिरानें ज्या पैतामह सिद्धांताची मतें दिली आहेत, तो पैतामह सिद्धांतही पांच वर्षाचेंच युग देतो:- रविशशिनोः पंचयुगं वर्षाणि पितामहोपदिष्टानि । अधिमासस्त्रिंशद्भिर्मासैरवमः स्त्रिषष्ट्यन्हाम् ।। -
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२६५
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही