पुराण निरीक्षण, ही चतुर्वर्षात्मक युगपद्धति नीट कळण्यासाठी पं. रुद्रपट्टणश्याम- शास्त्री यांनी काढिलेली गवामयनंची कल्पना थोडीशी समजून घेतली पाहिजे. ती मी येथें थोडक्यांत देतों :-- २५२ ० वैदिक ऋषींना ३६५१ दिवसांचें वर्ष माहीत होतें; व त्यांनी ३६० दिवसांच्या व्यावहारिक वर्षाचा स्वीकार केला होता. प्रत्येक वर्षाच्या अखेरीस १६ अक्षरांच्या १० बृहतीळंदाच्या कविता ते रचून ठेवीत; व येणेंकरून त्यांस किती वर्षे झाली हैं कळून येई. ३६० नंतरचे पांच दिवस मलदिवस समजले जात. दिवसांची ते अशी व्यवस्था लावीत की, प्रत्येक चार वर्षीच्या अखेरीस ते १ दिवस मिळवीत. या एका दिवसास ते गो, प्रजापति, सुपर्ण वगैरे म्हणत. गवामयनं म्ह. या चार वर्षीच्या अखेरीस येणाऱ्या या एकेक दिवसांची गति होय ! एका दिवसाचें गवामयन म्ह. ४ वर्षे, २ दिवसांचें म्हणजे ८ वर्षे, ३० दिव- सांचें म्हणजे १२० वर्षे इत्यादि. ३६० दिवसांचें गवामयनं म्हणजे १४४० वर्षे होत. गवामयनाच्या कालगणनेनें केलेले यज्ञ शतपथ ब्राह्मण, गोपेथ ब्राह्मण इ० तून लिहून ठेविलेले आहेत. जसें : – ३६२ दिवसांच्या गवा- मयनांत वैदिक कवींनी १०६ अनिष्टोम व २४० उक्थ्य झाले असें लिहून ठेविले आहे. अग्निष्टोम यज्ञ प्रत्येक १३ वर्षीला वैदिकऋषि करीत; व उक्थ्य ६-६ वर्षीला करीत. बृहदुक्थामध्ये ४६० गोंच्या अयनांचा लेख आहे. यानें १८४० वर्षे गेल्याचा बोध होतो. सारांश, वैदिक काळ-सुरवातीपासून १८४० वर्षे पर्यंत चालू होता; असें मानण्यांत येतें. वेदांगज्योतिषकार व बौधायन यांचा काळ सुमारें इ० पू० १२०० ( ११८१ ) हा असल्याबद्दल वर लिहिलेलेंच आहे. वैदिक कर्वीनी एका कालगणनेची १८४० वर्षे आणून
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२६७
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही