पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. येथें ' पुराणान्यखिलानि च ' असाही पाठ आहे. यावर अति प्राचीन टीकाकार मेधातिथि लिहितो कीं, 6 १२ पुराणानि व्यासादिप्रणीतानि सृष्ट्यादिवर्णनरूपाणि । खिलानि श्रीसूक्तमहानाम्निकादीनि ॥ ' , यावरून मेधातिथीच्या काळी पुराणें व्यासप्रणीत आहेत अशी समजूत होतीसें कळते. विष्णुस्मृति म्हणते की :-- पुराणं मानवो धर्मः सांगो वेदश्चिकित्सितम् || अत्रिस्मृति म्हणते कीं:- इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृंहयेत् ॥ सुत्तनिपात (सुमारे ३५० इ० पू० चा ) या बौद्धग्रंथांत (पृ. ११५) ' पुराणें' असा अनेकवचनी उल्लेख आहे. प्रो. टील हे मानवी संहिता बुद्धाच्या पूर्वीची मानतात व त्या संहितेंत 'पुराणांचा उल्लेख आहे. वरील उल्लेखांत विष्णुस्मृति व अत्रिस्मृति यांशिवाय बाकी सर्व उल्लेखांत " पुराणें ' अनेकवचनी आहेत. यावरून, कात्यायनस्मृति, भृगूक्त मानव- संहिता व सुत्तनिपात हे व्यांसानंतरचे ग्रंथ ठरतात; व ते तसे आहेतही. मूळचा स्वायंभुव मनु जरी व्यासांपूर्वीचा असला तरी भृगु कांहीं व्यासां- पूर्वीचा दिसत नाहीं; तो व्यासांनंतरचा दिसतो. मूळ व्यासांनी भारत लिहिलें तसें आज राहिलेले नसून त्याचें सद्यः स्वरूप इ० पू० १०० ते २०० इतकें अर्वाचीन आहे असें शोधकांचें मत आहे. तसें धरून चाललें तरी भारताच्या सद्य: स्वरूपकर्त्यास ( इ० पू० २०० च्या सुमारास ) अठराही पुराणे माहीत होती; पहा:-

  • अत्रिस्मृतीचा भृगूक्तमानवस्मृतीत ३-१६ मध्यें उल्लेख आहेः—

शुद्रावेदी पतत्यत्रेः ' याचा पुढेही उल्लेख होईल. (