प्रकरण तिसरें. २५५ या उतान्यांत पराशर, बळराम, कृष्ण वगैरे सातव्या वैवस्वत मन्वंत- रांत असल्याचा उल्लेख आहे. भविष्यपुराणानें भारतीय युद्ध कोणत्या वर्षी झाले हैं या पद्धतीत दिलेलें आहे. पहा:-- भविष्याख्ये महाकल्प प्राप्ते वैवस्वतेंतरे । अष्टाविंशे, द्वापरांते, कुरुक्षेत्रे रणोऽभवत् ॥ ४ ॥ प्रतिसर्ग पर्व, खंड ३, अ. १ ला. भविष्य कल्पांत, वैवस्वत भन्वंतरांत, २८ व्या चतुर्युगांतील द्वापरव- पांच्या अंती कुरुक्षेत्र रण झालें ! भविष्यकल्प म्ह. वराहकल्प होय ! यावरून कल्पारंभापासून किती वर्षांनंतर भारतीय युद्ध झाले हैं ठर- वितां येतें. पहा:- ६ मन्वंतरें = २८८ x ६ = १७२८ वर्षे. २७ चतुर्युगें २७ × ४ = १०८ द्वापार = ३ रें वर्ष ३ = " 29 १८३९ " कल्पापासून १८३९ व्या वर्षी भारतीय युद्ध झालें ! ही महत्त्वाची गोष्ट होय ! - वेदसंहिता व्यासानें केव्हां रचिल्या हें विष्णुपुराणानें दिलेले आहे :- ततोऽल, मत्सुतो व्यासोऽष्टाविंशतिमे॑तरे । वेदमेकं चतुष्पादं चतुर्धा व्यभजत् प्रभुः । या म्ह. वैवस्वत मन्वंतरांत, अढाविसाव्या चतुर्युगांत व्यासानें वेदांच्या संहिता रचिल्या. म्ह. कस्पानंतर १८३६-१८४० च्या दरम्यान वेदसंहिता रचल्या गेल्या !
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२७०
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही