पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण तिसरें. १८३९ वर्षापर्यंत सुरू होती. पुढें भारतीय युद्धानंतर ही कल्पाची गणना- पद्धति विसरून जाऊन फक्त भारतकाळापासून चंद्रगुप्तापर्यंत ९५१ वर्षे झालीं एवढीच परंपरा राहिली ! नंतर ५०-६० वर्षीनी पौराणिकांनीं पाहिले की ' द्वापरांते रणोऽभवत् ' असा उल्लेख आहे. यावरून त्यांनीं अनुमान काढिलें कीं भारतीय युद्धाच्या नंतर लगेच कलियुग सुरू झालें. मग तेव्हांपासून त्यांच्या वेळेपर्यंत जवळ जवळ १००० वर्षे झालींच होती. यावरून कलियुग १००० वर्षीचें ठरविण्यांत आलें! नंतर आणखी २०० वर्षीनी कलि १२०० वर्षीचा ठरविण्यांत आला ! याप्रमाणे खिस्ती शकापर्यंत कांहीं ' दिव्य वर्षे ' नव्हती; व कलि कांहीं ३६० x १२ ० ० = ४३२००० वर्षीचा झाला नव्हता ! ही व्यवस्था पुढील आर्यभटादि ज्योतिष्यांनीं व ५व्या ६व्या शतकांतील पौराणिकांनी केली ! सारांश, भारतीय युद्धाच्या वेळीं द्वापर व कलि हीं वर्षाचीं नांवें होती. तेव्हां १००० वर्षीचा कलि नव्हताच. ज्या ‘ द्वापरांती ' युद्ध झालें तो २००० वर्षाचा नसून ' एकच वर्षाचा' होता ! असो. या उलगड्यांवरून १०००।१२०० वर्षोचें कलियुग भारतीय युद्धानंतर ( म्ह. १२६३ इ० पू० नंतर ) १०००/१२०० वर्षांनंतरचे निघालें असावें हैं उघड होतें ! व ४३२००० वर्षाचा कलि तर आर्यभट्टाच्या वेळीच तयार झाला ! सारांश, मूळच्या युगांच्या विपरीतार्थानें, व कल्पा- रंभास कल्यारंभ समजण्यानें, भारतीय युद्धाचा खरा ऐतिहासिक काळ विसरून जाऊन त्यास कल्पारंभाचाच काळ इ० स० ३१०२ ) हा लावण्यांत आला ! चुकीची समजूत शके ५५६ (इ०स० ६३४ ) मधील एका शिलालेखांतही आहे ! हा ऐहोळे येथील सत्याश्रय पुलुके- शाच्या वेळच्या रविकीर्तीचा शिलालेख आहे. शिलालेखाची नकल ही:- 'त्रिंशत्सु त्रिसहस्रेषु भारतादावहादितः । सप्ताद्वशतयुक्तेषु गतेष्वष्देषु पंचसु । १७ २५७