पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२७४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण तिसरें, 'वनवासांत असतां पांडवांनी तीर्थे केली आहेत, तेव्हां लोमशऋषि बरोबर होते; सर्व वनवास १२ वर्षांचा होता हैं तर उघडच आहे. एके ढाई लोमशऋषि युधिष्ठिरास म्हणतात, की:- संधिरेष नरश्रेष्ठ ! त्रेताया द्वापरस्य च । वनपर्व, १२१ - १९. दुसऱ्या एका तीर्थात लोमश म्हणतात, कीः— संधिर्द्वयोर्नरश्रेष्ठ ! त्रेताया द्वापरस्य च ॥ २५९ वन, १२५-१४. याप्रमाणें पांडव तीर्थयात्रेत असतां दोन स्थळीं त्रेता व द्वापरांचा संधि होता. पुढे याच वनवासांत भीमाची व हनुमानाची गांठ पडतां म्हटलें आहे कीं: - एतत्कलियुगं नाम अचिराद्य प्रवर्तते । वन०, १४९-३७. म्हणजे वनवासाच्या १२ वर्षीच्या अवर्धीत एकदां त्रेताद्वापरांचा संधि होता व एकदां द्वापरकलींचा संधि होता ! मग हीं युगें होतीं तरी केवढीं ? तीं चार युगांची म्हणजे वर्षांची चतुर्युगें होतीं असें मानल्या- शिवाय गत्यंतरच नाहीं. पुनः भारतीय युद्धानंतर २६ किंवा ३६ वर्षांनी श्रीकृष्ण निजधामास गेला; तेव्हां लगेच कलि सुरू झाला. " यदा मुकुंदो भगवानिमां महीं जहाँ स्वतन्वा श्रवणीयसत्कथः ॥ तदाहरेवाप्रतिबुद्धचेतसां अधर्महेतुः कलिरन्ववर्तत || " भागवत, १-१५-३६. भारतीय युद्ध झाले तेव्हां ' द्वापरांत ' होता म्हणजे तो " द्वापर व कलि ' यांचा संधि होता. आतां प्रश्न असा उत्पन्न होतो कीं, वनवासांत त्रेता, द्वापर, व कलि आले आहेत, भारतीय युद्धांत द्वापर व कलि आहेत, व युद्धानंतर