प्रकरण तिसरें, २६३ २५६६ ( च अधिक जुळतें ) कल्पापासून गौतम बुद्धाच्या नि- र्वाणापर्यंतचा काळ. १८३९ कल्पापासून भारतीय युद्ध. ७२७ भारतीय युद्धापासून निर्वाणापर्यंत. आतां यावरून १२६३-७३७ = ५३६ इ० पू० हा निर्वाणकाल येतो. हा नेहमींच्या बुद्धाच्या निर्वाण काळाशीं ( इ० पू० ५४३ ) जवळच आहे ! पण गर्गाच्या मनांत , शाक्यकाल ( , नसून शककाल च असावा, असे मला वाटतें. भारतकाळी एक वर्षाचें युग होतें, यास उत्तम उदाहरण याच गर्गाच्या बृहद्गार्गीयसंहितेमध्यें मिळते. (Deccan Co, Mss. No 345 of 1879-80) ततो नरक्षये वृत्ते सुशांते नृपमंडले । भविष्यति कलिर्नाम चतुर्थं पश्चिमं युगम् । ततः कलियुगस्यांते परीक्षित् जनमेजय ! ॥ पृथिव्यां प्रथितः श्रीमानुत्पत्स्यति न संशयः । येथें भारतीय युद्धाचेंच वर्णन आहे. युद्ध झाल्यानंतर 'कलियुग' लागलें. नंतर त्या ' कलियुगाच्या शेवटीं' परीक्षित् जन्मला ! हैं कसें ! उत्तरा युद्धकाळीं गरोदर होती. ती पुढें कांहीं महिन्यांनी प्रसूत झाली. इतक्यांत कलियुग संपत आले असावें ! म्हणजे हैं अर्थात् एका वर्षाचेंच कलियुग होय ! सारांश, भारतीय युद्ध झालें तें वर्ष द्वापरयुग असून त्याचा अखेर होता; मग कलियुग लागून त्या वर्षाच्या अखेरच्या भागास परीक्षित् जन्मला.
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२७८
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही