पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण पहिलें. अष्टादशपुराणानां श्रवणाद्यत्फलं लभेत् । तत्फलं समवाप्नोति वैष्णवो नात्र संशयः || वैशंपायनीय महाभारत, १८-६-९५. याचें सद्यःस्वरूप आणखी २१३ शे वर्षांनी तरी प्राचीन असावें अशी आमची समजूत आहे. जैमिनीयाश्वमेधापर्यंतही अठरा पुराणांचा उल्लेख आहे:-

  • अष्टादशपुराणानां श्रवणाद्यत्फलं लभेत् ।

तत्फलं समवाप्नोति भारतश्रवणान्नरः ॥६८-९ ॥ इतकेंच नव्हे तर या पर्वात हरिवंश व श्रीमद्भागवत यांचाही स्पष्ट उल्लेख आहे:-- १३ शालिग्रामसमीपे तु भक्तया पुस्तकवाचनम् । भारतं हरिवंश वा पुत्रदं धनदं भवेत् ॥ श्रीमद्भागवतं पुण्यं भुक्तिमुक्तिफलप्रदम् ॥ २८- ९५ ॥ तसेंच वैशंपायनीय भारतांत हल्ली वनपर्वात वायु व मत्स्यपुराणांचा उल्लेख आहे:- - इत्येतन्मात्स्यकं नाम पुराणं परिकीर्तितम् । १८७-५८ ॥ एतत्ते सर्वमाख्यातं अतीतानागतं तथा । वायुप्रोक्तमनुस्मृत्य पुराणं ऋषिसंस्तुतम् || १९१-९६ ॥

  • याच अर्थाची ज्ञानेश्वरीतही ही ओवी आहे:-

नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं। सानीव धरूनि आंगीं । पुराणें आख्यानरूपें जगीं । भारता आलीं ॥ १-४६ ॥