तंसु धर्म नेत्र दुष्यंत शकुंतला मतिनार } पुराणनिरीक्षण. गौरीxयुवनाश्व मांधाता उद्योगपर्वातील गाल- वाख्यानावरून याच सुमारच्या राजांविष यीं आणखीही माहि- ती मिळते. ( अ. पु. १३ – १६ ) विश्रामित्राचा एक शिष्य गालव हा प्र- तिष्ठान ( प्रयाग ) येथें राज्य करीत भरतसर्वदमन असलेल्या इंदुवंश राजा ययाति याजकडे आला त्यास पैसा मागितला; पण त्याजवळ पैसा नसल्यामुळे त्याने आपली मुलगी माधवी ईस त्याजवळ पुरेसा पैसा उत्पन्न करण्यास दिली ! ! ! नंतर गालवानें तिला इक्ष्वाकुवंशीय हर्यश्वराजाकडे नेली; त्यास तिचे ठाई वसुमान नामक मुलगा झाला ! नंतर त्यानें तीस भीमसेनाचा पुत्र दिवो दास - जो काशींत राज्य करीत होता-याजकडे नेली; तेथें तिला त्याच्यापा- सून प्रतर्दन नांवाचा मुलगा झाला ! हर्यश्व व दिवोदास यांनीं गालवास पैसे दिले. नंतर गालवाने तिला भोजनगरच्या उशीनराकडे नेलें, तेथें तिला त्यापासून शित्रि नांवाचा मुलगा झाला. नंतर त्यानें तीस आपल्या गुरूर्जीकडे म्हणजे विश्वामित्राकडेच नेले व त्यापासून तिला अष्टक हा पुत्र झाला ; याप्रमाणें रकमेची पूर्ति झाली ! असो. याप्रकारें प्रतर्दन, वसुमना, शिबि व अष्टक हे इंदुवंशीय ययातीचे नातू होत ! प्रतर्दन, वसुमना, व शिवि हे अष्टकाच्या वाजपेय यज्ञास (नैमिषारण्यांतील) आले होते. (वन- पर्व अ. १९७ ). आदिपर्वातील उत्तर ययातिआख्यानांत हे ययातीचे नातू असल्याचा उल्लेख आहे.
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२८५
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही