पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. रामायणाच्या सद्यःस्वरूपांतही अनेक पुराणांचा उल्लेख आहे:- एतच्छ्रुत्वा रहःसूतो राजानमिदमब्रवीत् । श्रूयतां यत्पुरा वृत्तं पुराणेषु मय। श्रुतम् || बालकांड. याज्ञवल्क्यस्मृतीत म्हटले आहे की:- १४ यतो वेदाः पुराणानि विद्योपनिषदस्तथा । श्लोकाः सूत्राणि भाष्याणि यत्किंचन वाङ्मयम् ॥३-१८९॥ मेगेस्थीनीसच्या ( इ० पू० ३०० ) भारतीय राजांच्या पिढ्यांविषयींच्या माहितीवरून पहातां, जेव्हां पुराणें असली पाहिजेत असेंच म्हणावें लागतें. ही गोष्ट पाश्चात्य शोधकांनींही कबूल केलेली आहे. शौनकाच्या ऋग्विधानांत पुराणांचा याप्रमाणें उल्लेख आहे. ( याचा काळ युरोपीयन लोक निदान इ० पू० ५०० इतका तरी समजतात; पण या पुस्तकाच्या शेवीं शौनकाचा खरा काळ समजेल ):-- जपेयुरभ्रसूक्तं तु सर्वशाखाः पठंति वै । इतिहासपुराणानि सषडंगासदर्थकम् ॥ २१ ॥ व्हयामसि जपेन्मंत्रं शतवारं दिने दिने । व्यासोक्ते तु पुराणार्थे याथार्थ्य दृश्यते सदा ॥ २२९ ॥ तु यावरून शौनकाच्या वेळीं इतिहास ( भारत ) व पुराणें ( अनेक ) होतीं व तीं व्यासोक्त आहेत अशीही पण समज होती, हें अगर्दी उघड होतें. बृहज्जाबालोपनिषदांतही पुराणांचा असा उल्लेख आहे:- य एतद्द्बृहज्जाबालं नित्यमधीते स ऋचोऽधीते स यजूंष्यधीते स