पुराणानिरीक्षण. यानेंही ययातीप्रमाणेंच हजार वर्षांचें सत्र केलें असें विष्णुपुराणांत म्हटले आहे:- - २७८ इक्ष्वाकुतनयो योऽसौ निमिनाम स तु सहस्रसंवत्सरं सतमारेभे४-४-५ यावरून निमि * कल्प १००० च्या वेळी झाला हें कळेल; यामुळे हा निमि इक्ष्वाकुकुलांतील असला तरी त्याचा पुत्र दिसत नाहीं. या कल्पाचे १८३९ वे वर्षी भारतीय युद्ध झालें; याचे १९१४ चे सुमारास जनमे- जय राज्यारूढ झाला. त्यानंतर शौनक नैमिषारण्यांत दीक्षित झाल्यावेळी या कल्पाचें २००० वें वर्ष गेलें ! पहाः- नैमिषे निमिषक्षेत्रे ऋषयः शौनकादयः । सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्रसममासत || भागवत १-१-४. हैं कल्पाचें दुसरें हजारावें वर्ष होय; म्हणजे ३१०२-२००० = इ. पू. ११०२ रें वर्ष होय. मूळ भागवत प्रथम सूतानें इ. पू. ११०२ वर्षी शौनकास सांगितलें ! ! ! . यानंतर, बारा वर्षांनी याच शौनकाला सौतीनें मूळ भारत ( द्वादश- वार्षिक सत्र चालू असतां ) इ. पू. १०९० वर्षी सांगितलें ! ! ! यावरून सूर्यचंद्रवंशांचे वृक्ष याप्रमाणें कल्प काळांत दाखवितां येतात:-
- तसेंच, भारत, शांतिपर्व, यांत कपिलाच्या सांख्यशास्त्राचा प्रवर्तक पंच-
शिखाचार्य यानेंही ' सहस्रवार्षिक ' सत्र केल्याचा उल्लेख आहे. यावरून तो या निमीचाच समकालीन असावा; पंचारीखाचा काळ याप्रमाणें कल्प १००० ऊर्फ इ. पू. २१०२ हा ठरतो.