पुराणानिरीक्षण. स्वायंभुवमनूपासून यौवनाश्वापर्यंत जवळ जवळ ( २० + १९ ) ४० पिढ्या गेल्या. पिढीस २२ ते २५ वर्षे धरिली तर तेवढ्या पिढ्यांची ८८० ते १००० च्या दरम्यान कांहीं वर्षे होतात; आपण मागच्या प्रकर- •णांत मांधात्याचा काळ ९२२ कल्प ठरविलेला आहे; तेव्हां तो बरोबरच दिसतोः -- १८० चंद्रसूर्यवंशांचा आणखी संबंध दाखविणारा आणखी एक वंशवृक्ष येथें देतों :- --
- युवनाश्वस्यै पुत्रीं तु कावेरीं जन्हुरावहत् ॥ १९ ॥
+ + + + + कुशिकस्तु तपस्तेपे पुत्रमिंदसमं प्रभुम् ॥ २४ ॥ लभतामिति तं शक्रः त्रासादयेत्य जज्ञिवान् ॥ पूर्ण वर्षसहस्त्रे वै ततः शक्रो ह्यपश्यत ॥ २५ ॥ पुत्रत्वं कल्पयामास देवेंद्रः सुरसत्तमः ॥ स गाधिरभवद्राजा मघवान् कौशिकः स्वयम् ॥ पौरुकुत्सा च तद्भार्या गाधिस्तस्यामजायत ॥ ब्र० पु० अ० ८. हा कल्प १००० नंतरचा विश्वामित्र शकुंतलेचा बाप व कण्वमेधातिथींचा समकालीन होय. दीर्घतमा मामतेय याच शकुंतलेचा पुत्र जो भरत त्याचा पुरो- हित झाला. ( तेव्हां तोही याच वेळचा होय. हा विश्वामित्र त्रिशंकूचा आश्रय- दाता — रामकालीन विश्वामित्राहून भिन्न होय. एतेन हवा ऐंद्रेण महाभिषेकेण दीर्घतमा मामतेयो भरतं दौष्यंतिमाभषिषेच, (ऐतरेय ब्रा०पंचिका ८ ) हा ममता पुत्र दीर्घतमा कोण होता है पाहूं:-