१८२ पुराणनिरीक्षण. अयं सहस्रं ऋषिभिः सहस्कृतः समुद्र इव पप्रथे । सत्यः सोऽस्य महिमा गृणेशवो यज्ञेषु विप्रराज्ये ॥ शुक्ल - यजुर्वेद, ३३-८३. हा मंत्राचा द्रष्टा मेधातिथि कण्वाचा पुत्र आहे. ( सर्वानुक्रमणी, कात्या- यनाची, पहा ). " ह्या हजाराचा सत्य महिमा Brahmanic World ब्राह्मणसमुदायांत यज्ञांत फार गायिला जातो व तो ऋषींनी जमून याची कल्पना केली आहे ! ! ! किंवा यास ठरविला आहे. " कण्व व मेधातिथि यांचे वेळीं कल्पाचें हजारावें वर्ष गेलें हैं आम्हों नुकतेंच वर पाहिलेले आहे, तेव्हां मेधा- तिथीच्या वेळीं १००० वें वर्ष असल्यास नवल नाहीं. तसेंच, सहस्रस्य प्रमाऽसि । सहस्रस्य प्रतिमासि । सहस्रस्योन्मासि । साहस्रोऽसि । सहस्राय त्वा ॥ शु० य० वे० १५-६५. यांत ऋषि अग्नीला म्हणतो- तूं हजारांचे प्रमाण आहेस; तूं इजारांचा प्रतिनिधि आहेस; तूं हजार मोजणारा आहेस. तूं हजारांचा आहेस; तुला हजारांसाठी मी ( प्रतिष्ठित करितों ) " यांत हें हजारावें वर्ष घेतल्या- खेरीज, व गवामयन कल्पनेमध्ये अग्नीच्या योगें ऋषि कालगणनापद्धति करीत असें पं० रुद्रपट्टण श्यामशास्त्रीप्रमाणे मानल्याखेरीज, शब्दाचा निर्वाह लागणें शक्य दिसत नाहीं. नाहींतर अग्नीस असे म्हणणे याचा अर्थ काय ? हैं कोण ऋषि अग्नीस म्हणतो, हे मात्र सर्वानुक्रमणीवरून कळले नाहीं. मात्र आयूचें या अध्यायांत नांव आलेले आहे. तेव्हां हा मंत्र रचणारा बहुतकरून आयूनंतरचा असावा. आयूनंतर ययातीचे वेळी कल्पाचें १००० वें वर्ष गेलें हैं आम्हों वर पाहिलेलेच आहे. वैदिक ऋषींस कालगणना माहीत नव्हती असें आतां कोण म्हणूं शकेल ?
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२९७
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही