प्रकरण पहिलें. सामान्यधीते सोऽवथर्वणमधीते सोंऽगिरसमधीते स शाखा अधीते स कल्पानधीते स नाराशंसीरधीते स पुराणान्यधीते स ब्रह्मप्रवणमधीते । १५ यांत जाबालानें पुराणांचा (अनेकार्थी ) उल्लेख केलेला आहे; या- वरूनच त्याच्या वेळीं पुराणें अनेक झाली होतीं हैं सिद्ध होतें. हा व्यासानंतरच होता. यास प्रमाण :-- बृहदारण्यकाच्या आठव्या अध्या- याच्या तिसऱ्या ब्राह्मणांत उद्दालकआरुणींपासून जावालापर्यंत शिष्य परंपरा अशी दिली आहे:--उद्दालक आरुणि वाजसनेय याज्ञवल्क्य- मधुक पैङ्गय——जानक आयस्थूण - सत्यकाम जाबाल. याज्ञवल्क्य हा वैशं- पायनाचा शिष्य होता. पुढे तीन पिढ्यांनी जाबाल झाला; अर्थातच तेव्हां व्यासांनी पुराणसंहिता प्रचलित केलेल्या असाव्यात. असो. याप्रमाणे जाबाल, शौनक, कात्यायन, भृगु, इत्यादिकांच्या वेळी अनेक पुराणें उप- लब्ध होती ! , आश्वलायनगृह्यसूत्रांत ' महाभारता चा उल्लेख तर आहेच. शिवाय, पुराणांचा अनेकवचनी उल्लेख आहे. तो असाः – “ आयुष्मतां कथाः कीर्तयंतो पयमानाः । " ( ४-६ ). मांगल्यानीतिहासपुराणानीत्याख्या- यांतील 'इतिहास' म्हणजे भारत असून 'पुराणानि ' म्हणजे व्यासोक्त मूळ पुराणें होत स्पष्ट होतें. आश्वलायनाचे वेळीं मग पुराणें अनेक झालीं होतीं ! गर्गाचार्यांचा ( यादवांचे गुरु ) गर्गसंहिता म्हणून यादवांच्या चरित्र- पर एक १२ हजारांचा ग्रंथ आहे. त्यांत यादवांविषय अपूर्व माहिती मिळते. हा ग्रंथ फारसा कोणाच्या पहाण्यांत नाहीं; पण हा भारत जसा पांडवांच्या इतिहासास महत्त्वाचा तद्वत्व यादवांची विशेष हकीकत कळ-
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३०
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही