पुराणनिरीक्षण. याच व्याडीनें पाणीनीय व्याकरणावर लक्षश्लोकात्मक संग्रह नांवाचा ग्रंथ लिहिला आहे; त्याचा उल्लेख वृत्तीत असा आहे :-- २८८ ससंग्रहं व्याकरणमधीते । ६-३-३६ तसेंच ( २ - ३ - ६६ ) वरील वृत्तीत कात्यायन म्हणतो, कीं:- शोभना खलु दाक्षायणस्य संग्रहस्य कृति: । शोभना खलु दाक्षायणेन संग्रहस्य कृतिः । ( व्याडीसच दाक्षायण म्हणत असत ). व्याडीच्या या संग्रह ग्रंथाचा पतंजलीनें महाभाष्यांत उल्लेख केलेला आहे:- - संग्रहे एतत्प्राधान्येन परीक्षितम् । यावर, संग्रहो व्याडिकृतो लक्षश्लोकसंख्यो ग्रंथ इति प्रसिद्धिः । असा नागेशभट्टानें कैय्यटव्याख्याविवरणांत खुलासा केलेला आहे; शिवाय भर्तृहरीच्या वाक्यप्रदीपांत या व्याडीच्या संग्रहाचा उल्लेख आहे:- प्रायेण संक्षेपरुचीन् अल्पविद्यापरिग्रहान् । संप्राप्य वैयाकरणान् संग्रह स्तमुपागते कृतेऽथ पतंजलिना गुरुणा तीर्थदर्शिना । सर्वेषां न्यायबीजानां महाभाष्ये निबंधने । + + + यः पतंजलिशिष्येभ्यो भ्रष्टो व्याकरणागमः । कालेन दाक्षिणात्येषु ग्रंथमात्रे व्यवस्थितः । • पर्वतादागमं लब्ध्वा भाष्यबीजानुसारिभिः । स नीतो बहुशाखत्वं चंद्राचार्यादिभिः पुनः । +
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३०३
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही