पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३०४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण चौथें.. हा भर्तृहरि महाभाष्य, *चंद्राचार्य व आचार्य वसुरात (इ.स. ४८० ) यानंतरचा इ. स. ६०० च्या सुमारचा ( बौद्ध ) ग्रंथकार होय. याप्रमाणे, संग्रह हा पाणिनीय व्याकरणावरील टीकारूप असा ब्याडीचा ग्रंथ होय हैं कळून येईल. गरुडपुराणांत ह्याचा असा उल्लेख आहे:- - २८९

  • याच चंद्राचार्याचा, तो अभिमन्युनामक काश्मीरराजाच्या वेळी नागार्जु-

नाचा समकालीन होता व त्यानें महाभाष्य काश्मीरदेशांत प्रवृत्त केलें व आपलेंही व्याकरण सुरू केले असा उल्लेख आहे; पहाः-- चंद्राचार्यादिभिलब्ध्वा देशात्तस्मात्तदागमम् । वर्तितं महाभाष्यं स्वं च व्याकरणं कृतम् ॥ राजतरंगणी १-१७६. चंद्राचार्य व नागार्जुन भिक्षु काश्मीरच्या अभिमन्यूच्या वेळीं होते असें म्हट- ले आहे. नागार्जुनाचा काळ मागें आम्हीं इ० पू० ७४-४० पर्यंत असलेला पाहिलेला आहे. त्यावरून चंद्राचार्य व अभिमन्यु याचाही काळ इ० पू० पहिले शतक हाच ठरतो. यांहीपूर्वी पतंजलीचें भाष्य होतें ! त्याचा काळ इ० पू० १५० सामान्यतः धरितात. यानें काश्मीरच्या जलूक राजाचा उल्लेख केलेला आहे :– वाररुचं काव्यं, जालूकाः श्लोकाः ( ४-३- १ ) . कित्येक हा जालूक म्हणजे चंद्रगुप्ताचा समकालीन यवनराजा ' सेल्यूकस् ' समजतात. असें असेल तर पतंजलीचा काळ इ० पू० ३००च्या नंतर ठरवावा लागेल. पुष्पमित्र व अग्निमित्र ( शुंगराजे) यांचा व 'अरुणद्यवनः साकेतम्' या यवनांनीं साकेतास वेढलेल्या हकीकतीचा यानें उल्लेख केलेला असल्यामुळे याचा काळ सामान्यत्वें इ० स० १४४ नंतर धरितात. पुष्पमित्राचा काळ इ० पू० १७५ - १३९ हा आहे. अग्निमित्र त्यानंतरचा. (साकेतावरची ) मिनांडरची स्वारी इ० पू० १४४ च्या सुमारची. यामुळे इ० पू० १४० च्या सुमारचा पतंजलि धरणें जरूर पडतें. इ० पू० दुसरें शतक हा याचा काळ होय ! १९