२९० पुराणनिरीक्षण. व्याडिर्जगाद जगतां हि महाप्रभावः सिद्धो विदग्धहिततत्परया दयालुः ॥ रत्नप्रकरण. हा प्रमाणभूत रससिद्ध होता अशी माहिती रत्नसमुच्चयांत मिळते:- व्याड्याचार्यश्चंद्रसेनो इ० । यावरून याचा रसविद्येवर तिसरा एकादा ग्रंथ असावा. असो. याचा संग्रहग्रंथ पाणिनीय व्याकरणावर टीकारूप असल्यामुळे, अर्था- तच पाणिनि, शौनक व त्याचा शिष्य व्याडि-यांहून प्राचीनतर ठरेल ! म्हणजे कल्प २००० ऊर्फ इ० पू० ११०२ च्या पूर्वीच पाणिनीचा काळ येतो. . पाणिनीचा काळ. पाणिनि हा पिंगलाचा बंधु होता, अशी षड्गुरुशिष्यानें एक परंपरा दिलेली आहे. ती खरी असेल तर पाणिनीचा बरोबर काळ ठरेल. भारत आदिपर्व, अ. ५३ मध्यें जनमेजयाच्या सर्पसत्रांत कोणकोण सदस्य होते हैं सांगितलें आहे; त्यांत पिंगल, जैमिनी, व्यास, उद्दालक वगैरे नांवें आहेत :- उद्गाता ब्राह्मणो वृद्धो विद्वान्को सोऽथ जैमिनिः । ब्रह्माऽभवत्सागरवो अध्वर्युश्चापि पिंगलः ॥ ६ ॥ सदस्यश्चाभवद्व्यासः पुत्रशिष्यसहायवान् ॥ उद्दालकः प्रमतकः श्वेतकेतुश्च पिंगलः ॥ ७ ॥ सातव्या श्लोकांतील ' पिंगल' श्वेतकेतूचें विशेषण आहे. साहव्यां- तील पिंगल हे अध्वर्यु पदावर असलेल्या ऋषीचें नांव आहे. पुढें समा- रोप करितेवेळीं ' एते चान्ये च बहवो ब्राह्मणा वेदपारगाः । सदस्यश्चाऽ
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३०५
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही