प्रकरण ५ वें. पौराणिक भूगोल. कांही दिवसांपूर्वी केसरींत रा. राजवाडे यांनीं ' आमची पुराणें व असीरियांतील नवे शोध' म्हणून कांहीं लेख छापले. त्यांत पौराणिक भूगोल म्हणजे कविकल्पना नसून, त्यांत प्राचीन काळच्या भूलोकावरील त्या त्या देशांची नांवें आहेत असे त्यांनी दाखविलेले आहे. मी त्याच माहितीचा तारांश, व इतर थोडी माहिती दिग्दर्शनार्थ येथें देतों. आपल्या पौराणिक भूगोलावर असीरियांतील नव्या शोधांचा प्रकाश पडलेला आहे. तेथील इष्टिकालेखांवरून आशियाखंडाच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश पडतो. तसेंच, पूर्वी एके काळी ग्रीसपासून चीनपर्यंतचे सर्व देश चातु- र्वर्ण्यविशिष्ट होते; पण हें चातुर्वर्ण्य त्यांस न झेंपल्यामुळे आर्यावर्ताशिवाय बाकी सर्व आशियांतील लोकांनी मनुसंहितेंत सांगितल्याप्रमाणें चातुर्वर्ण्य धर्म सोडून ते ( वृषल ) झाले, हेंही कळून आलेले आहे. मंद ऊर्फ मंदग भारताच्या भीष्मपर्वाच्या अकराव्या अध्यायांत शाकद्वीपांत मग, मशक, मानस, व मंदग हे चार वर्ण असल्याबद्दल उल्लेख आहे. मग हे शाकद्वीपीय ब्राह्मण होत;मशक हे क्षत्रिय, मानस हे वैश्य व मंदग हे शूद्र होत. प्राचीन असीरियन् लोक आपणांस अशूर ' ( असूर ) म्हणवीत; असीरियन हा अपभ्रष्ट उच्चार आहे. या असुर किंवा अशूर लोकांच्या इतिहासांत मंद ( ऊर्फ मदंग ) यांचा वारंवार उल्लेख येतो. ( Historians' His. of the World, खंड २ रा, पृ. ५९९ पहा. ) त्यांत मंद लोकांची बरीच माहिती आहे. यांत सिथियन म्हणजेच मंद ( Manda ) होत असें म्हटलेलें आहे. 6
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३०८
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही