पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३०९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. १ Elam सिथियन हा अपभ्रष्ट उच्चार असून शकस्थानीय - सकस्थानीय स्कथियन- Skythian— अशी उच्चारपरंपरा अपभ्रष्ट झाली ! सिथियन तेच शक' होत. मंद हे शाकद्वीपांतील शक-शूद्र होते; हे मिढां- ( Mecles ) हून भिन्न होत. मंद नांवाच्या शक- शूद्रांनीं इ० पू०७०० ते ५५० पर्यंत ' असुर' देशावर राज्य केलें; नंतर ' इलाम प्रांतांतील Cyrus यानें आपलें राज्य सुरू करून असुरांचें राज्य बुडविलें, 'असुरांच्या लेखांतील मंद तेच आपल्या इतिहासपुराणांतील शक-शूद्र मंदग होत ! भीष्माच्या वेळी भारतीय आर्य या मंदगास शक-शूद्र समजत; पण असुरांच्या लेखांत त्यांना शक-शूद्र कोठेंही म्हटलेलें नाहीं. याचा अर्थ असा कीं, भीष्माच्या वेळी शाकद्वीपीय लोकांत जें चातु- र्वर्ण्य होतें, तें असुरहडन Esarhaddon ( असूरहयवदन ? ) याच्या वेळेपर्यंत पार मोडून जाऊन मंद म्हणजे शाकवंशीय एक कुळ एवढीच प्रसिद्धि ई० पू० ७०० च्या सुमारास होती. २९४ O श्रीकृष्णपुत्र सांब यानें शाकद्वीपाहून सूर्यप्रतिमास्थापनार्थ मग ब्राह्मण आणविले होते अशी भविष्यपुराणांत कथा आहे. ( ब्राह्मपर्व, अ. १३९ व पुढे पहा ). यावरून या वेळीं शकद्वीपांत चातुर्वर्ण्य अजून कायम होतें असें वाटतें; पण तेव्हां त्यांच्यांत धर्मभ्रष्टतेला सुरवात झालेली होती असें ' भोजक ' शब्दावरून दिसतें:- अनुष्ठानविहीना ये न ते भोज्यास्तु भोजकाः । त्यांतील ' भोजक' हे अनुष्ठानहीन असल्यामुळें अभोज्य-अपांक्त होत ! सांवानंतर इ० पू० ७०० च्या मध्यंतरी हे शाकद्वीपीय सर्वच शूद्रप्राय होऊन एकवर्णी मंद झाले व रानटी स्थितीस पोंचले ( वृषलत्वं गताः ) होते असें अनुमान होतें.