पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. ण्यास अत्यंत उपयुक्त आहे; व हा भारतकालीन ग्रंथ आहे, म्हणूनही याचें महत्त्व आहे. तत्कालीन इतिहास यांत पुष्कळ सांपडतो. असो. यांत अठ- राही पुराणांचीं स्पष्ट नांवें असून त्यांचें माहात्म्यही वर्णिलेले आहे. १६ व्याडि ( इ० पू० सुमारें १००० ) यांनी आपल्या विकृतिवल्लीत आदिपुराणांतून याप्रकारें उतारा घेतलेला आहे:- क्रमाध्ययनसंपन्नो मंत्रब्राह्मणपारगः । जटापारायणपरो रुद्रलोके महीयते । इत्यादिपुराणे । हैं ' आदिपुराण' म्हणजे ब्राह्मपुराण असावेंसें वाटते. भर्तृहरीनें ( इ० पू० पहिले शतक ) वैराग्यशतकांत पुराणांचा याप्रकारें उल्लेख केलेला आहे:- किं वेदैः स्मृतिभिः पुराणपठनैः शास्त्रैर्महाविस्तरैः ॥ इ. असो. याप्रमाणें व्यासांनी पुराणें (अठरा ) प्रचलित केली यांत शंका दिसत नाही. पुराणांचें कार्य व त्यांचा हेतु. पुराणें व्यासांनीं कशासाठी प्रवृत्त केली ? याचा आतां आपण विचार करूं:- इतिहासपुराणानि मया सृष्टानि सुव्रत । य एते चतुरो वेदा गूढार्थाः सततं स्मृताः ॥ अतस्त्वैतानि सृष्टानि बौधायैषां महामुने || भविष्यपुराण, १-९४-५९ इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृंहयेत् । बिभेत्यल्पश्रुताद्वेदो मामयं प्रतरिष्यति ॥ भारत.