. २९६ पुराणानिरीक्षण. 6 किंवा पर्सु म्हणत असत. हे ' इलिप्पि ' देशांत मीढ ' लोकांच्या दक्षिणेस राहात असत. हे ' इलिप्पीच्या ' राज्यांत इ. पू. ४००० वर्षो- पासून प्रसिद्ध होते. यांच्या वैदिकधर्मात झर्तुष्ट याच्या द्वारा बराच फरक झाला व हा विपर्यस्त धर्म व इ. पू. ५०० नंतर बरेच पारसिक लोकांन स्वीकारिला Parthians हे ' पारद ' होत; हे पारद गांधार देशच्या शेजारी राहात. 6 बर्बर बर्बर–बब्बल बाबल अर्शी अपभ्रष्टरूपें झाली असावत, बौद्ध लोकांनी बाबिलोनियाला ' बाबेरु ' म्हटलेले आहे. त्यांचे एक ' बाबेरु ' जातकच आहे. यांचा उल्लेख पहा:- यावना 5 किराता गांधाराचीनाः शबरबर्बराः शकास्तुषाराः कंकाश्च पल्हवाश्चांप्रमद्रकाः ॥ शांतिपर्व १६५ अ. इलावृत्त हा जो जंबूद्वीपाचा एक भाग, याच्यांत असुरांच्या कांळीं शकांनी स्वाऱ्या करून राज्ये मिळविली होती. हे मूळचे शाकद्वीपांतले होत. तिकडून ते इलावृत्तांत आले होते ( इ. पू. ६०० ). जंबूद्वीप-काश्मिराच्या उत्तरेस एका बिंदूपासून सहा पर्वतांच्या रांगा निघालेल्या आहेत. ( १ ) हिमालय, ( २ ) काराकोरम, ( ३ ) कुवेन- लुन, ( ४ ) थियेनशान, ( ५ ) हिंदुकुश, ( ६ ) सुलैमान. हे साहा पर्वत ज्या मध्यबिंदूपासून निघतात त्यास पुराणकार मेरुपर्वत म्हणतात. हा पर्वत भूपद्माच्या कार्णकेसारखा आहे. याच्या दक्षिणेस हिमालय, हेमकूट व निषध असे तीन पर्वत आहेत. हेमकूट म्ह० हिंदुकुश व निषध म्ह० सध्याचा सुलैमान, नील म्ह० काराकोरम, श्वेत म्ह० कुवेनलून, व शृंगी म्ह० थियेनशान असें रा. राजवाड्यांचें मत आहे. हे सहा पर्वत ज्या द्वीपांत आहेत तें जंबूद्वीप होय. जम्मु हें जंबूचा अवशेष आहे. जंबू-
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३११
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही