प्रकरण पांचवें. द्वीपांत भारतवर्ष, किंपुरुषवर्ष, हरिवर्ष, रम्यकवर्ष, हिरण्मयवर्ष, उत्तरकुरु- वर्ष, इलावृत्तवर्ष, भद्राश्व, व गंधमादन असे नऊ विभाग आहेत. पैकीं पहिले तीन मेरूच्या दक्षिणेस; व दुसरे तीन मेरूच्या उत्तरेस असून या साहींच्या मध्यभाग विस्तृत असें पश्चिमेस इलावृत्तवर्ष आहे. पूर्वेस भद्राश्ववर्ष आहे व मध्यें गंधमादन आहे. पैकी मानससरोवर ज्यांत आहे तें भद्राश्व, आफगाणिस्तान व पर्रीिया ज्या भागांत आहेत तें इलावृत्त व मेरूच्या उत्तरेकडील तें उत्तर कुरुवर्ष होय, असें रा. राजवाडे म्हणतात. जंबूद्वीपाच्या मेरु ऊर्फ गंधमादन प्रदेशांत प्राचीनकाळी देव राहात असत. लक्षद्वीप. सध्याचें आशियाटिक तुर्कस्थान, युरोपियन तुर्कस्थान व ग्रीस मिळून पूर्वीचें प्लक्षद्वीप होय. ग्रीकांच्या अतिप्राचीन इतिहासांत Palasgie म्हणून नांव येतें तें 'प्लक्षा ' चें अपभ्रष्ट रूपच होय. २९७ प्लक्षद्वीप क्षारोद समुद्राभोंवतीं आहे. क्षारोद म्ह० सध्याचा भूमध्यसमुद्र होय, असें रा० राजवाडे यांचें मत आहे. प्लक्षद्वीपांत आर्यक, कुरव, विविंश व भाविन असे चार वर्ष असत. प्लक्षद्वीपादिषु ब्रह्मन् शाकद्वीपांतिकेषु च। विष्णु पुराण. शाल्मलिद्वीप. सध्यांचा Black Sea म्हणजे इक्षुरसोद असून तो व कास्पीयन समुद्र यांमधील प्रदेश शाल्मलिद्वीप होय, असें रा० राजवाडे म्हणतात. कुशद्वीप. सध्याचा काश्पीयन समुद्र म्ह० सुरोद व अरल समुद्र म्हणजे घृतोद असून यांमधील प्रदेशच कुशद्वीप होय, असें राजवाडे यांचे मत आहे. कुशद्वीप हिंदुकुशच्या उत्तरेस होतें. असुर व बर्बर लोक कुशद्वीपांतील
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३१२
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही