पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणानिरीक्षण, Medes ( मीढां ) मध्यें शितिरपण व एपर्ण अशी नांवें होती ! वरील एकंदर वर्णनावरून समारोप करितेवेळीं रा. राजवाडे म्हणतात की: – भारतांतून व पुराणांतून नमूद केलेले वृत्तांत बऱ्याच अंशानें विश्व- सनीय आहेत. हा विश्वसनीय वृत्तांत कांहीं अविश्वसनीय बाबींनी संकलित झालेला आहे. + + + पुराणांतील पर्वतांच्या लांबीरुंदी वगैरे अयथार्थ आहेत असें मानावें लागतें. सारांश, पुराणें व इतिहास यांतील मजकूर पारखून घेतला पाहिजे व तो तसा घेतां येण्यासारखा आहे. भारतवर्षातील नऊ भागांपैकी इंद्रद्वीप हा एक माग आहे; यावरूनच अपभ्रंशपरंपरेनें इंद्रद्वीप- इंददीअ – इंदिय= India ( इंदिया ) हें नांव सबंध भारत वर्षीस पडले असावें असें राजवाडे मानतात. भारत वर्षाचा पश्चिमोत्तर भागच इंद्रद्वीप असून त्यांतच पुढें इंद्रप्रस्थ ( शकप्रस्थ ) नगर वसविण्यांत आले असे त्यांचें मत आहे. ( वारणावत कदाचित् वारुण भागांतील असेल ). ३०० मेरुपर्वत कोठें आहे ? 3 उत्तरध्रुवाजवळचा तो महामेरु ऊर्फ उत्तरमेरु; पण हिंदुस्थानच्या बाहेर जवळच हिमवान्, हेमकूट व निषध या पर्वतांच्या उत्तरेस शोभणारा-जंबू- द्वीपाच्या मध्यवर्ती असा हा सुमेरु कोणता ? व कोठें असावा ? याचा कोठें पत्ता लागतो काय ? हा पर्वत बामियन् काबूल व गिझनी यांच्या उत्तरेस असावा असें क. टॅडचें मत आहे; परंतु ग्रीक लोकांच्या लेखां- प्रमाणें हा मेरुपर्वत जरा पूर्वेकडेस असावा. 'एशियाटिक रिसर्चेस ' ( पुस्तक ६, पृ. ४९७ ) मध्ये लिहिले आहे कीं, पेशावर व जिलाचाद यांच्या मध्ये २००० फूट उंचीची ' मेरुकोह' नांवाची एक टैंकडी असून, तिच्या पश्चिमेस कांहीं गुहा आहेत; पर्शनमध्ये ' कोह ' याचा अर्थ टैंकडी होतो. यावरून ' मेरुकोह ' म्हणजे मेरुपर्वतच होय ! हुमा-