पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०२ पुराणनिरीक्षण. क्रीटबेट व त्या भोंवतालचा भूमध्यसमुद्र यास घृतद्वीप व घृतसमुद्र घृत = ग्रीट= Grita=Crete अर्शी रूपांतरें झाली. Sasons हे शकसूनु असून हे शाकद्वीपांतून पश्चिमेकडे गेले; शाकद्वीपीय लोकांनी युरोपखंडांत वस्ती केली ! 'इक्षुसमुद्र' म्हणजे Enxine Sea ऊर्फ Black Sea होय. शाकलोक मोठे प्रवळ असून मूळचे चक्षुनदीच्या कांठचे राहणारे हाते. चक्षु म्हणजे Oxus होय. " + ८ .; प्राचीन ग्रीक लेखक Imans Homodi व Paropamison असे पर्वत हिंदुस्थानच्या जवळ सांगतात. हे पुराणांतील हिमवत् हेमकूट व निषेध हे होत. यांशिवाय, त्यांनीं Merus ( the abode of the gods ) नांवाचा पर्वत सांगितलेला आहे. शाकद्वीपाबद्दल रा. राजवाड्यांप्रमाणेच प्राचीन पाश्चात्य लेखकांचें मत आहे:- " Sey thin was a name applied to an immense area in the north of Europe anb Asia, the limits. of which have been variously given by ancient geographers " Ancient. Geog. by Bryce P. 138. पर्जूच्या ग्रंथांतील प्रमाण. वेंदिदाद नामक पारशी ग्रंथाच्या पहिल्या फर्गर्डमध्ये कांहीं भौगोलिक माहिती आहे. मला झेंड ( छंदसू ) भाषा येत नसल्यामुळे प्रो. स्वीजल व प्रो. हौ यांच्या भाषांतरावरून ही माहिती घेतलेली आहे:- + सारांश, भूगोलाचें हें प्रकरण येथेंच पुरें करितों; पुराणांतून पुष्कळ भूगोल आहे, इतिहास व कालगणनाही आहे.

  • हूँ ' परोपनिषन' म्हणजे पहारो-टेकडी, निषन निषध आहे असे कित्येक

मानतात. याचा सभोवतालचा प्रदेशच 'नैषध' देश होय. ग्रीकांनीं 'निसा किंवा ' निषध ' शहर त्याच पर्वताच्या पायथ्यांशीं वर्णिलेले आहे. ,