पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०४ पुराणनिरीक्षण. " नंतर वारावें उत्तम स्थान, तीन कोट (जाती) असलेलें Ragha उत्पन्न केलें. नंतर तेरावें उत्तम स्थान मजबूत Chakhara उत्पन्न केलें. नंतर चौदावें उत्तमस्थान चार कोपऱ्यांचें Varena उत्पन्न केलें; तेथें Thrae- taono थेटाओनो उत्पन्न झाला; त्यानें Dahaka दशक सर्प मारिला. "नंतर पंधरावें उत्तम स्थान हतहिंदHapta Henduउत्पन्न केलें. इ. इ. " यांतील स्थानांविषयीं पाश्चात्यांची मतें अशीं आहेत. १ आर्यणवीजो-Distant North, beyond Jaxartes ( प्रो. हौ ) तेथें हिंवाळा दहा महिने राहतो असे म्हटलें आहे. यावरून रा. बळवंतराव टिळक यांनी हा प्रदेश उत्तरध्रुवाकडेच असावा, असें म्हटले आहे [ Arctic Home in the Vedas ]. 'आर्यानां बीजो' हैं मूळ रूप असावें; याचा अर्थ आर्यावर्त. २ = Sogdiana ( सोगडियाना ) ३ = Merv=मरुस्थली - हाच पुराणांतील मध्य 'मेरु' असावा. ४ = बाल्ख = बाल्हीक. ५ निषा=ग्रीकांची Nissce= हेंच पुराणांतील निषध होय. = ६ हिरात असावें असें पाश्चात्त्यांचें मत आहे. पण मला वाटतें की, ही हरोयु म्हणजे सरयू नदी असावी; व तींत पुष्कळ पाणी आहे; ऋग्वेदांतील नदीसूक्तांत ऋमु ( कोरम ) व कुभा ( काबूल ) या नद्यां- बरोबर एक ‘ सरयू ’ येते; तीच या हिरात प्रांतांतील हरोयू ( र ) असावी. = ऋग्वेद १० - ६४ -९ मध्यें सरस्वती व सिंधूबरोबर २१ नद्यांपैकी म्हणून सरयू नदी आलेली आहे; ही आफगाणिस्थानांतीलच नदी असावी. १०-६४-८ मध्यें 'त्रिसप्त' २१ नद्यांचा उल्लेख आहे. ७ = काबूल ( प्रो. स्पीजल ); सीजस्थान ( इतरांच्या मतें ).