पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण पहिलें. पुराणांचा मुख्य उद्देश गूढ वेदार्थ प्रकट करून लोकांना परम पुण्य अशा देवताभक्तीस लावावें, हा आहे. पद्मपुराणांत म्हटले आहे की:- पुराणे धर्मनिचयः । ८ पुराणांत धर्माचा निर्णय आहे. पुराणे म्हणजे शिमगा असे म्हणणारे म्हणोत; पण पूर्वीचे लोक ' पुराणांचा हेतु केवळ धर्मनिश्चय हाच आहे ' असें मानीत असत. याप्रमाणेंच त्यांच्या वाचनाचीं फळें अशी दिली आहेत:- अतः कलौ मनुष्याणां पुराणं पापनाशनम् । स्त्रीणां द्विजातिबंधूनां सर्वेषां च शरीरिणाम् ॥ एष साधारणः पंथाः साक्षात्कैवल्यसिद्धिदः । ये श्रावयंति मनुजान्पुण्यां पौराणिक कथाम् । कल्पकोटिशतं साग्रं तिष्ठंति ब्रह्मणः पदम् || विशेषतः कलियुगे पुराणश्रवणं विना । नान्योऽस्ति तरणोपायः पुराणेष्वपि वादिनाम् ॥ पद्म पु. बेदांचा अर्थ कळणे दुर्योध होत चाललें, तेव्हां स्त्रिया, वैश्य व शूद्र या सर्वोस सारखा सुलभ रीतीनें कळेल असा धर्मनिश्चय सांगणे जरूर पडलें, हैं धर्मनिश्चयाचें कार्य व्यासांनी सर्व जनांच्या हितासाठी केलें:- -- इति संचित्य कृपया भगवान्बादरायणः । हिताय तेषां विदधे पुराणाख्यं सुधारसम् ॥* 6 १ पुराणे ' अमृतरस ' म्हणणारे हे उद्गार कोणीकडे व तीं ' शिमगा म्हणणारे अर्वाचीन गाजरपारखी कोणीकडे ? असो. पुराणांत पूर्वीची परंपरा जरी सांगावयाची असली; तसेंच सर्ग, प्रति-

  • पुराणींचा इतिहास | गोड रस सेविला । तुकाराम.