पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ६ वें. पूर्वकल्पाचा इतिहास. -:०:- हल्लींचें कल्प इ. पू. ३१०२ साली सुरू झालें हैं पूर्वी दाखविलेले आहे. आतां पूर्वकल्पाची कांहीं हकीकत मिळते की काय हे आपण पाहूं. भागवतांत सत्यव्रतराजा अतीतकल्पांत होऊन गेल्याचा व तोच पुढें या कल्पांत वैवस्वत मनु होऊन जन्मल्याचा उल्लेख आहे. योऽसौ सत्यव्रतो नाम राजपिद्रविडेश्वरः ॥ ज्ञानं योऽतीतकल्पांते लेभे पुरुषसेवया ॥ ९-१-२. स तु सत्यव्रतो राजा ज्ञानविज्ञानसंयुतः ।। विष्णोः प्रसादात् कल्पेऽस्मिन् आसीद्वैवस्वतो मनुः ॥ भागवत, ८-२४-५८. पूर्वकल्पांतील सत्यव्रत ऊर्फ मनु याच्या वेळींच प्रलय झाला असें म्हटले आहे; व हाच सत्यव्रत हल्लींच्या कल्पांत वैवस्वत मनु झाला. दक्ष प्रजापतीचा काळ. दक्षाबद्दल ब्रह्मपुराण लिहितें की, -- युगे युगे भवंत्येते पुनर्दक्षादयोऽनृपाः । पुनश्चैव निरुध्यंते विद्वांस्तत्र न मुह्यति ॥२॥ ज्यैष्ठ्यं कानिष्ठयमेतेषां पूर्व नास्ति द्विजोत्तम ।