३१३ पुराणनिरीक्षण. तरांतच येतो. सारांश, चाक्षुष मन्वंतरानंतर लौकरच मनूच्या काळीं प्रळय झाला. हाचं भागवतांतील पूर्वकल्पांतील सत्यव्रत होय. = .... आतां ग्रीकांचे ५४५१ व ५४६२ हे आंकडे कोणाच्या वेळेपासूनचे असावेत हैं आपण पाहूं. बॅकस्पासून चंद्रगुसापर्यंत ५४६२ वर्षे झाली; म्हणजे हा काळ ( ५४६२ + ३१२ = ) ५७७४ इ. पू. या वर्षी सुरू झाला असावा. चाक्षुष मन्वंतराच्या प्रारंभी ( इ. पू. ५६९४ ) कश्यप प्रजापति ( दक्षाचे जामाता ) होते. तेव्हां दक्ष म्हातारे असावेत; यावरून इ. पू. ५७७४ हा ग्रीकांनी दिलेला काळ या दक्षाच्या जन्मा- चाच असावा. Daksha = Daccus = Bacchus असे अपभ्रंश झाले असावेत. दक्ष चाक्षुष मन्वंतराच्या प्रारंभी म्हातारा असावा हैं मार्गे पाहिलेच आहे. तेव्हां त्याचें वय ७५-८० वर्षाचें असावें ! ग्रीकांच्या इ. पू. ५७७४ यांतून चाक्षुष मन्वंतर प्रारंभाचा इ. पू. ५६९४ हा काळ वजा करितां दक्षाचें वय बरोबर ८० वर्षे निघतें. तेव्हां ग्रीकांनी दिलेली कालगणना दक्षाच्या जन्मापासून असावी असे वाटतें. 2 कोणी हा Bacchus or Dionysus म्हणजे वैवस्वत मनु किंवा त्याचा पुत्र इक्ष्वाकु समजतात; पण कालगणनादृष्ट्या पाहतां तो पूर्वकल्पां- तील ज्येष्ठ दक्षच असावा. ग्रीकांच्या पिढ्यामात्र स्वायंभुव मनूपासून व त्या तशा असणें साहजिकच आहे; कारण पृथुवैन्यानंतरच्या स्वायं- भुव मनूपासूनच पुराणांतून राजाच्या पिढ्या आढळतात. त्यांचा तपशील:- ( १ ) स्वायंभुव मनूपासून वैवस्वत मनूपर्यंत. (२) इक्ष्वाकूपासून रामचंद्रापर्यंत १९ ६२-६४ ( ३ ) लव-कुशांपासून सुमित्रापर्यंत ( सुमित्रास महापद्मानें मारिलें) ६२ ( ४ ) नंतरचे नंद ९ ... ... ... ... १५३-१५४
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३२७
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही