पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सहावें. ३१९ ' निर्माण झाली नव्हतीं हैं कळून येतें. वृद्धगर्गाचा काळ कोणी शकानंतर धरितात व कोणी शकापूर्वी धरितात; त्याच्या काळाशी आम्हांस कर्तव्य नाहीं. ग्रीक लोकांनी ज्या एका ( दक्ष ) काळाची ५४५१-५४६२ ही वर्षे दिली आहेत, त्याच काळाचें ५५५० किंवा ५५५५ हें वर्ष वृद्ध गर्गानें शालिशूकाचा राज्यारंभकाळ म्हणून दिलेले आहे; तसेंच, हल्लींच्या कल्पारंभापासून प्रळयापर्यंत २२२५ वर्षे झाली या भारतीय प्रमाणांवरून सांगितलेल्या अल्बुमझारच्या प्रळयाच्या काळाशीं, आमच्या युग मन्वंतर पद्धतीनें काढिलेला प्रळयकाळ जुळतो-यावरूनही एके काळी मागें दिलेले कोष्टक–व त्यांतील युग मन्वंतर पद्धति प्रचलित होती याविषयों शंका राहणार नाहीं. सारांश- १ ( १ ) मॅगेस्थीनीसच्या वेळी १२००० वर्षाची चौकडी हैं प्रमाण ठरले नव्हतें ( इ. पू. ३०० ). ( २ ) वृद्धगर्गाचे वेळीही १२००० वर्षाची चौकडी हैं प्रमाण ठरलें नव्हतें; शिवाय, याचेकाळी ' कलियुग ' एक वर्षाचें होतें १ . त्याच्या युगपुराणांतून पूर्वी दाखविलेंच आहे. ( ३ ) आर्यभटाचे वेळी ३६०० वर्षे झाली होतीं. हा चतुर्युगाचे पाद सारखे मानतो; यावरून प्रत्येक युग सारख्या लांबीचें असें याचें मत होतें; पण याचे काळी १२००० वर्षांची चौकडी ठरून गेली होती; यानें १२०० वर्षीच्या कलीचीं वर्षे दिव्य धरून त्यांस ३६० नीं गुणून काल ४३२००० वर्षीचा बनविला. या पूर्वीच चौकडीची पद्धत ठरविण्यांत आली असावी. यानें कल्पारंभापासून जो ३६०० वर्षांचा काळ परंपरेनें त्याच्या वेळेपर्यंत आला होता, तो कल्पारंभापासूनचा समजून भारतीय युद्धापासून आपल्या वेळेपर्यंत ३६०० वर्षे गेलीं अशी सम- जूत करून घेतली. सारांश, एकेक वर्षाचे कलि, द्वापर, त्रेता व कृत या