प्रकरण पहिलें. तशींच तीं आतां आहेत काय ? या प्रश्नाविषय इतर विद्वानांची काय मतें आहेत हे आपण अगोदर पाहूं. •• There is a good deal in the Puranas, that, I think, must be admitted to be very ancient, while undoubtedly also there is a great deal in them that is very modern. " कै० तेलंग (भगवद्गीतेच्या भाषांतराची प्रस्तावना, पृ०१४) यांचें मत असें आहे की, पुराणांतील पुष्कळ भाग अति प्राचीन असला तरी बराच भाग अर्था- चीनही आहे. दुसऱ्या एका शोधकानें पुराणांविषयी उद्गार काढिले आहेत ते असेः- पुराणें हीं भारताशी अगदी निकटसंबद्ध असून त्यांत देवतांची भक्ति प्रतिपादिली असते. महाभारतांत 6 १ पुराण शब्द देवर्षिचरित्रवाचक आलेला आहे. भारताचे १८ वें पर्व व हरिवंश यांत १८ पुराणांचा जरी. उल्लेख असला तरी हल्लींची पुराणें भारतानंतरची आहेत; असें जरी आहे तरी त्यांत प्राचीन भाग बराच आहे. Never-the-less they contain much that is old, and it is. not always possible to assume that the passages they have in common with the महाभारत and मनु have been borrowed from those works " His. of Sk. Lit. by Mac Domel. P.299-317. पुराणांचा व श्रुतिस्मृतिग्रंथांचाही संबंध असून, त्यांचींच पुराणेही परिणत स्वरूपें आहेत असें वरील शोधक म्हणतात. मागें आम्ही दाखविलेंच आहे की श्रुति, स्मृति, पुराणें, इतिहास हे सर्व धर्मनिर्णयार्थच आहेत; तेव्हां त्यांचा परस्पर संबंध असलाच पाहिजे हे उघड आहे. अशीच समजूत वज्रसूचिकोपनिषदाच्या वेळीही होती; हें उपनिषद् अश्वघोष ( इ. पू० पहिलें शतक ) या बौद्ध ग्रंथकारापूर्वीच होतें; कारण त्यानें ‘ वज्रसूची ' नामक विध्वंसक टीका त्याच्या पूर्वार्धावर लिहिली आहे. हैं उपनिषद् म्हणते
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३४
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही