पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराण- शोधक-ग्रंथमाला. महाराष्ट्रभाषेची वृत्तपत्रांतून दहाबारा वर्षे सेवा केल्यानंतर मनास वाटले की मासिक पुस्तकद्वारें स्वतंत्रपणें थोडीबहुत सेवा करावी; परंतु, मासिक पुस्तकाविषय महाराष्ट्रीय वाचकांची भारीच अनास्था दिसून आल्यामुळे व तीन वर्षाच्या ' समालोचका ' च्या अनुभवानें तें मासिक पुस्तक पुढें चालविणें अशक्य आहे अशी खात्री झाल्यामुळे, आतां महा- राष्ट्राची ग्रंथद्वारें थोडीबहुत सेवा करावी अशी इच्छा उद्भवलेली आहे. या इच्छेस अनुसरून ही 'पुराणशोधक ग्रंथमाला ' हल्ली काढलेली आहे. या मालेचा मुख्य उद्देश असा आहे की वाचकांच्या मनांत प्राचीनकाळच्या एकंदर स्थितीविषयीं नीट कल्पना येऊन त्यांचे मनांत प्राचीन काळचा इतिहास, भूगोल, शास्त्रें, कालगणना, परंपरा इत्यादि गोष्टीं- विषय नवा प्रकाश पडावा. अशा हेतूनें काढलेल्या या ग्रंथमालेस तरी महाराष्ट्रांतील वाचकवर्ग उदार आश्रय देतील अशी आमची आशा आहे. या ग्रंथमालेंतील पहिले पुस्तक. -- पुराणनिरीक्षण. हैं आहे. यांत, पुराणं म्हणजे काय, तीं व्यासांनींच लिहिलीं काय ? त्यांनी लिहिल्याप्रमाणेच तीं हल्ह्रीं मिळतात काय, मत्स्य व नारद पुरा- णांच्या लक्षणांप्रमाणेच हल्लीं पुराणें आहेत काय, पुराणांचे कोणकोणत्या ग्रंथांत उल्लेख आहेत, श्रीमद्भागवत किती प्राचीन आहे, तें बोपदेवानें.. केले आहे की काय, इत्यादि प्रश्नांचें विवेचन असून, शिवाय अठराही पुराणांची यांत थोडक्यात माहिती आहे. पौराणिक कालगणना, इतिहास