प्रकरण पहिलें. cases they must be copied from some other similar work of from a common or prior original. याचा सारांश असा की, अनेक पुराणांतून कित्येक ठाई जे शब्दैक्य - किंबहुना शेंकडों श्लोकांचे जे अक्षरशः सारखे भाग आढळतात त्यांवरून पहातां हे भाग पूर्वीच्या एकाद्या समान मूळ पुराणांतून उतरून घेतलेले असले पाहिजेत; किंवा याच पुराणांची पूर्वरूपें म्हणजे प्राचीनतर रूपें एके काळी प्रचलित असली पाहिजेत. २१ या दोन कल्पनांपैकी कोणती कल्पना खरी ठरते हैं आपण पाहूं. व्यासांपूर्वी अनेक पुराणें नव्हतीं हैं वर दाखविलेच आहे; तेव्हां हल्लींच्या पुराणांतून अनेक आदिपुराणांचा जर उल्लेख असेल, तर ती आदिपुराणें म्हणजे व्यासांनंतरचीं या पुराणांचींच पूर्वरूपें होत असें धरण्यास कांहीं हरकत दिसत नाही. तर असे आदिपुराणांचे उल्लेख हल्लींच्या पुराणांमधून आहेत की काय, हें आपण पाहूं. भारतांतील हरिवंशांतील भविष्यपर्वाच्या प्रारंभी शृणुष्वादिपुराणेषु वेदेभ्यश्च यथा श्रुतं । ब्राह्मणानां च वदतां श्रुत्वा वै सुमहात्मनाम् || यथा च तपसा दृष्ट्वा बृहस्पतिसमद्युतिः । पराशरसुतः श्रीमान् उरुद्वैपायनोऽब्रवीत् ॥ तत्तेऽहं कथयिष्यामि यथाशक्ति यथाश्रुति ॥ या भविष्यपर्वात अनेक पुराणांतील कथा आलेल्या आहेत; त्या कथा भारताच्या सद्यःस्वरूपापूर्वी प्रचलित असलेल्या व्यासोक्त पुराणांच्या आदिस्वरूपांवरून त्यांत घातलेल्या असाव्यात. या दृष्टीनें भारताचा व पुराणांचा तुलनात्मक अभ्यास करणे अत्यंत जरूर आहे. भारतांत निदान त्याच्या सद्यःस्वरूपांत तरी मत्स्य व वायु पुराणांच्या नांवाचा स्पष्ट उल्लेख
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३६
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही