पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ पुराणनिरीक्षण. स्यान हा पुराणाध्याय मात्स्यांत होता हैं कळून येईल. मात्स्याच्या मतें सर्व पुराणें चार लक्ष होत ! तेव्हां त्याही पूर्वीच पुराणसंख्या ४ लक्षांची झाली असली पाहिजे हैं उघड आहे. मागें जें आम्ही हल्लींच्या पुराणांतील 'झुणुष्वादिपुराणेषु ' असे उतारे दिलेले आहेत, ते याच वेळी लिहिल्या गेलेल्या, किंवा पुनरुक्त झालेल्या पुराणांतील असावेत. सारांश, हल्लीच्या पुराणांचा पाया विक्रमानंतर ५०-७५ वर्षांनी घातला गेला असावा, असे वाटते. व्यासांच्या आदिपुराणांवरून हल्लींचीं पुराणें प्रचलित झाल्या- नंतर ती पूर्वीचीं पुराणें बहुतेक बुडाली असावीत असे वाटतें ! उपपुराणें तर विक्रमानंतरच निर्माण झाली यांत शंकाच दिसत नाहीं. व्यासांचीं ‘ आदिपुराणे कशी असतील व त्यांतील उतारे कोणत्या स्वरूपाचे असतील हैं पाहण्यास मिळणें आतां दुर्घट झालेले आहे; तथा इ. पू. ४०० ते ५०० च्या सुमाराच्या आपस्तंबधर्मसूत्रांत जे पुराणां- तील उतारे येतात त्यांवरून पुराणांच्या प्राचीन स्वरूपाची कल्पना करितां येईल; व हे उतारे प्रचलित पुराणांतून कोठें मिळतात काय हेंही पाहतां येईल:- - (१) अथ पुराणे लोकावुढाहर॑ति । 66 ·

  • उद्यतामाहृतां भिक्षां पुरस्तादप्रवेदिताम् ।

भोज्यां मेने प्रजापतिरपि दुष्कृतकारिणः ॥

  • न तस्य पितरोऽश्नंति दश वर्षाणि पंच च ।

नच हव्यं वहत्यग्निर्यस्ता मभ्यधिमन्यते ॥ इति ॥ १३ ॥ चिकित्सकस्य मृगयोः शल्यकृ॑तस्य पाशिनः । कुलटायाः षंडकस्य च तेषामन्नमनाद्यम् ॥ १४ ॥

  • मनु ४-२४८ व २४९ पहा. वरील उताऱ्यांपेक्षां मानवसंहितेतील

असलेच श्लोक अर्वाचीन दिसतात.