पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण पहिलें. असे जरी आहे तरी व्यासांची मूळ पुराणें व्यासांच्या वेळेपासून तों इ० पू० १०० सुमारपर्यंत प्रचलित असून विक्रमाच्या वेळी ती अर्वा- चीन भाषेत पुनरुक्त झाली हैं स्पष्ट दिसतें. तेव्हां, प्राचीन व्यासोक्त आदिपुराणांवरून पुनरुक्तस्वरूपांत प्रचलित पुराणें चतुर्लक्षग्रंथरूपानें प्रवृत्त केली गेलीं. पुराणे द्वितीय संस्करणांनीं वृद्धि पावलीं, हें भविष्यपुराणांत एके ठाई स्पष्टच लिहिले आहे :- सर्वाण्येव पुराणानि संज्ञेयानि नरर्षभ । द्वादशैव सहस्राणि प्रोक्तानीह मनीषिभिः ॥ पुनर्वृद्धिं गतानीह आख्यानैर्विविधैर्नृप । यथा स्कांदं तथा चेदं भविष्यं कुरुनंदन स्कांदं शतसहस्रं तु लोकानां ज्ञातमेव हि । भविष्यमेतदृषिणा लक्षार्धं संख्यया कृतम् ।। भविष्य पु. ब्रह्मपर्व; अ. १ १०४ ते १०६. २९ यांत सर्व पुराणें पूर्वी १२ हजारांचीं होतीं; तीं पुढें उपाख्यानांनीं व आख्यानांनी वृद्धि पावलीं; ही अत्यंत महत्त्वाची परंपरा दिलेली आहे. तेव्हां व्यासोक्त आदिपुराणें प्रत्येकी बारा हजारांची असावीत असे वाटतें. व्यासांपासून तो विक्रमाच्या वेळेपर्यंत जी कांहीं इतर पौराणिक सामग्री जमली असेल ती सर्व पुराणांत अंतर्भूत करून सुमारें विक्रमाच्या वेळीं ह्रीं पुराणें चार लक्षांची केली गेलीं असली पाहिजेत; व पुढे तर स्कांद व भविष्य हीं अनुक्रमें एक व अर्धा लक्षापर्यंत वाढलीं ! सारांश, विक्र मोत्तरकाळी पुराणांस सद्यःस्वरूप मिळालें ! विक्रमोत्तरकालीन पुराणें ! अठरा पुराणे चार लक्ष, भारत एक लक्ष व रामायण २४ हजार या