३१ प्रकरण पहिले. तरी संस्कार झालेले आहेत. सारांश, व्यासांपूर्वीचें पुराण, व्यासकृत आदिपुराणांची प्रवृत्ति, ती आदिपुराणें विक्रमाच्या काळापर्यंत स्वस्वरू- पांत बहुधा कायम असणे, तेव्हां त्या प्रत्येकाची बहुधा १२ हजार संख्या असणे, नंतर विक्रमकाळी पुराणांवर द्वितीय संस्कार होऊन ती सूतांकडून पुनरुक्त होणें; त्यांची संख्या तेव्हां चतुर्लक्ष होणें; त्यानंतर इ० स० ५००-६०० च्या सुमारास सद्यःकालीन पुराणांस भविष्य- वर्णनाचे भाग जोडण्यांत येणें, नंतर कांहीं कांहीं पुराणांत मतप्राबल्याच्या वेळीं कांही प्रक्षेप जोडण्यांत येणें, इतके संस्कार पुराणांस झालेले स्पष्ट दिसत आहेत. तथापि, विल्सन वगैरे मंडळी समजतात तितकी कांहीं आमची पुराणे अर्वाचीन नाहीत. त्यांत प्राचीन व अर्वाचीन मजकुराची भेळ असली तरी प्राचीन मजकूर कोणता व अर्वाचीन मजकूर कोणता हैं चटकन् कळून येतें. प्रत्येक पुराणाचें सद्यःस्वरूप किती प्राचीन आहे हैं अनेक उल्लेखांवरून त्या त्या पुराणांखालींच दाखविलेले आहे. हल्लींच्या स्वरूपांत हीं पुराणें निदान १८०० वर्षे तरी आहेत यांत शंकाच नाही. श्रीशंकराचार्याची आठव्या शतकांत पुराणांविषयी काय समजूत होती तें पहाः - ऋग्वेदादिविभागेन चतुर्धा वेदा व्यस्ताः । आद्यो वेद एक- विंशतिधा कृतः । द्वितीय एकोत्तरशतधा कृतः । सामवेदः सहस्रधा कृतः । अथर्ववेदो नवधा शाखाभेदेन कृतः । अन्यानि पुराणानि व्यस्तानि अनेनेति व्यासः । यांत व्यासांनी पुराणसंहिता केल्या असा स्पष्ट उल्लेख आहे; मागें शौनकाच्या वेळी पुराणें ' व्यासोक्त असल्याबद्दलची समजूत व उल्लेख दिलेलेच आहेत. असो.
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/४६
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही