पुराणानिरीक्षण. आठव्या शतकापूर्वीच पुराणार्णव ग्रंथ तयार झालेला होता; त्यांतून श्रीमद्भागवताचें लक्षण चित्सुखाचार्यांनी उतरून घेतलेले आहे. त्यावरून त्या पुराणार्णवांत सर्वही पुराणांची लक्षणे दिलेली असली पाहिजेत. हा ग्रंथ मिळेल तर वरें होईल. ३२ तसेंच शके ११८५ मध्ये रत्नमालेच्या माधवटीकेंत उल्लिखित असा पुराणसमुच्चय ग्रंथही महत्त्वाचा आहे. तोही मिळाला पाहिजे; यांतील उतारा मागें भक्तरंजनीनें घेतलेला मी दिलेलाच आहे. पुराणें कोणती ? मद्वयं भद्वयं चैव व्रत्रयं वचतुष्टयम् । अनापल्लिंगकृस्कानि पुराणानि पृथक् पृथक् || आलिंपाग्नि पुराणानि कूस्कं गारुडमेव च । पुराणांची नांवें अर्शी:- १ ब्राह्म, २ पाद्म, ३ वैष्णव, ४ शैव किंवा वायु, ५ भागवत, ६ भविष्य, ७ नारद, ८ मार्कडेय, ९ अग्नि, १० ब्रह्मवैवर्त, ११ लिंग, १२ वाराह, १३ स्कंद, १४ वामन, १५ कूर्म, १६ मात्स्य, १७गरुड, व १८ ब्रह्मांड. यांपैकी शैव किती, वैष्णव किती व इतर देवतांचें किती, यांचें वर्गी- करण असे आहे.. पुराणैर्दशभिर्विप्राः प्रोक्तः शंभुस्तथैव च । चतुर्भिर्भगवान् विष्णुर्द्वाभ्यां ब्रह्मा प्रकीर्तितः ॥ अग्निरेकेन विप्रेंद्रास्तथैकेन दिवाकरः ॥ सर्व पुराणें मिळून ४ लक्ष, त्याचा तपशील असाः --
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/४७
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही