पुराणनिरीक्षण. (about future kings) are foretold, have, in all other respectse the character of as great antiquity as any works of their 33 class. ३४ तसेंच, भरतखंडाच्या कोणत्याही भागांत निदान ब्राह्म, विष्णु, वायु, मात्स्य, पाद्म, भागवत व कूर्म या पुराणांच्या प्रति तरी अगदर्दी सारख्या मिळतात असे त्यांचें म्हणणं आहे. असो. पुराणांतील विषय. याप्रमाणें पुराणांविषयीं सामान्य विचार केल्यानंतर पुराणांत काय काय विषय येतात हैं आपण याहूं. 'पुराणे धर्मनिश्चयः ' हें वचन आपण मागे पाहिलेंच आहे. तेव्हां धर्मनिश्चय ज्यानें ज्याने होत असेल असा सर्व मजकूर यांत येणार हैं उघड आहे. सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतरें, वंशानुचरित--यांशिवाय अनेक तीर्थमाहात्म्य, व्रतमाहात्म्य, दानमाहात्म्य, तिथिमाहात्म्य, श्राद्धादिकल्पमाहात्म्य, अनेकविद्यामाहात्म्य, विद्याप्रवर्तक- माहात्म्य, सारांश - यांत सर्व कांहीं धर्म, इतिहास, विद्या, पूर्वपरंपरा- अनेक विज्ञान - येईल; व यामुळेच पुराणपढणांची फलश्रुति याप्रमाणें दिलेली आहे:- - यो विद्याच्चतुरो वेदान्सांगोपनिषदो द्विजः । न चेपुराणं संविद्यान्नैव स स्याद्विचक्षणः || इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृंहयेत् । बिभेत्यल्पश्रुताद्वेदो मामयं प्रहरिष्यति ।। ये त्वेतानि समस्तानि पुराणानि च जानते । भारतं च महाबहो ते सर्वज्ञा मता नृणाम् ॥ यश्चतुर्वेदविद्विप्रः पुराणं वेत्ति नार्थतः ।
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/४९
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही