पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/५४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरें, पूर्वभागोऽयमुदितः पुराणस्यास्य मानद || ( तदुत्तरभागे ।) अस्योत्तरविभागे तु पुरुषोत्तमवर्णनम् । योगानां च समाख्यानं सांख्यानां चाऽपि वर्णनम् || ब्रह्मवादसमुद्देशः पुराणस्य च शासनम् । एतद् ब्रह्मपुराणं तु भागद्वयसमर्चितम् || वर्णितं सर्वपापघ्नं सर्वसौख्यप्रदायकम् || नारद पु०, ४-२ अ. या सूचीवरून प्रचलित ब्रह्मपुराण नारदपुराणाच्या वेळी असेंच होतें हैं कळून येतें. पाश्चात्य लोक म्हणतात की, प्रचलित ब्रह्मपुराणांत पांच लक्षणे नाहीत; पण सूक्ष्मदृष्टया पहातां यांत र्ती सर्व लक्षणें असलेली दिसून येतील. हें पुराण इ. स. च्या १३ व्या किंवा १४ व्या शतकांत बनलें असें विल्सनचें मत आहे; पण तें बरोबर नाहीं; कारण ११ व्या शतकांतील दानसागरांत व त्याच वेळच्या हलायुधकृत ब्राह्मणसर्वस्वांत व हेमाद्रीच्या ग्रंथांतून या पुराणांतील उतारे आढळतात. या पुराणाच्या १७६ व्या अध्यायांत अनंत वासुदेवाचें माहात्म्य वर्णि- लेले आहे. उत्कल ( ओडिसा ) देशाच्या प्रसिद्ध भुवनेश्वर क्षेत्रांत अनंत वासुदेवाचें मंदिर विद्यमान आहे. तेथील सामवेदिगणाचा पद्धतिकार अद्वितीय पंडित भवदेवभट्ट यानें आपल्या पूर्वीच असलेल्या अनंत वासु- देवाचे मंदिराचा ११ व्या शतकांत जीर्णोद्धार केला. ब्रह्मपुराणांत अनंत वासुदेवाची मूर्ति, तिची उत्पत्ति व तिचें माहात्म्य आहे, पण या मंदिराचा तेथें संबंध नाहीं. त्यांत या मंदिराचा उल्लेख नाहीं. वर्तमान पुरुषोत्तम- १ ' समन्वितम्' असाही पाठ आहे.