पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरं. एवढेच नव्हे तर ब्रह्मपुराणांतील अनेक प्रसंग महाभारताच्या अनु- शासनपर्वात जशाचे तसेच उतरून घेतलेले आहेत. ब्रह्मपु० २२३ते२२५ अध्याय व अनुशासनपर्व १४३ ते १४५ अध्याय; तसेच ब्रह्मपुराणाचा २२६ वा अध्याय व अनुशासनाचा १४६ वा अध्याय सारखे आहेत. यावरून, कित्येक असें अनुमान करितात की, महाभारतावरूनच ब्रह्मपुराणानें हे अध्याय घेतले; पण, अनुशासनांत- ४१ इदं चैवापरं देवि ब्रह्मण्यं समुदाहृतम् । १४३ - १६, व पितामहमुखोत्सृष्टं प्रमाणमिति मे मतिः १४३-१८. या वाक्यांवरून ब्रह्मपुराणांतूनच महाभारतानें हे श्लोक घेतले आहेत हैं सिद्ध होतें. * वास्तविक पहातां पुराणांचा उद्देश जो वेदोपबृंहण, तो या पुराणांत आहे. यांत तीर्थवर्णनप्रसंगांत अनेक वैदिक उपाख्यानें आलेली आहेत. ऋक्संहिता, सांख्यायनब्राह्मण, ऐतरेय ब्राह्मण, बृहद्देवता इत्यादि वैदिक ग्रंथांतील उपाख्यानें या पुराणांत आढळतात. यामुळे यांत पुष्कळ आर्ष प्रयोग वगैरे आढळतात. व्याडीनें विकृतिवल्लींत उतरून घेतलेला श्लोक याच पुराणांतला असण्याचा संभव आहे. (पृ. १६ पहा ) गौडपादाचार्यांनी उत्तरगीताटीकेंत ' पुराणानि ब्राह्मादीनि ' असा याचा उल्लेख केलेला आहे. बाराव्या शतकांतील अपरादित्यानें यांतील उतारे घेतलेले आहेत. असो. • मत्स्यपुराणमतें हैं १३ हजार श्लोकांचें आहे. दुसऱ्या पाठाप्रमाणें व इतर पुराणांप्रमाणें हें १० हजारांचें आहे. दोनशें त्रेचाळीस अध्यायांचें हल्लीं जें ब्रह्मपुराण मिळत आहे त्यांत १३ हजारांवर कांहीं अधिक श्लोक

  • हरिवंशाचे व ब्रह्मपुराणाचेही कांहीं भाग सारखे आढळतात.