प्रकरण दुसरे, ४३. दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट या पुराणावद्दल लक्षांत ठेवाव- याची ती अशी की, भारताच्या ( बंगाली प्रतीच्या ) शांतिपर्वातील अध्याय ३०० पासून ३०९ पर्यंतचे ४७६ श्लोक आनंदाश्रमांत छाप- लेल्या ब्रह्मपुराणांतील अध्याय २३८ ते २४५ पर्यंतच्या ४७६ श्लोकांशी अक्षरश: जुळतात. हा वसिष्ठकरालजनकसंवाद दोन्ही ठिकाणी अगदी सारखा आहे. यावरून भारताच्या सद्य: स्वरूपाच्या काळी ब्रहापुराणांत हे अध्याय होते व त्यांतूनच हे अध्याय भारतकारानें घेतले असावेत हैं क्ळून येईल. * पद्मपुराण, २ रें. प्रचलित पद्मपुराण सृष्टि आदि पांच खंडांत विभक्त आहे. मत्स्यपु- राणांत ५३।१४ यांचें लक्षण असे दिलेले आहे:- एतदेव यदा पद्म भृद्धैरण्मयं जगत् । तद्द्वृत्तांताश्रयं तद्वत्पाद्ममित्युच्यते बुधैः ॥ पाझं तत्पंचपंचाशत्सहस्राणीति पठ्यते । हलींच्या पाताल व उत्तरखंडांतील कित्येक भागांवर ते पुराणक्रमाला धरून नाहीत असे आक्षेप आहेत. याकरितां यांचें लक्षण नीट तपासून पाहूं. सृष्टिखंडाच्या ३६ व्या अध्यायांत, मत्स्यांत जसें लक्षण सांगितलें आहे त्याचप्रमाणे माहिती आहे:- - पद्मरूपमभूदेतत्कथं पद्ममयं जयत् । कथं च वैष्णवी सृष्टिः पद्ममध्येऽभवत्पुरा ||
- तसेंच, ब्रह्म व विष्णुपुराण यांतील कृष्णचरित्राचे श्लोक अगदीं सारखे
आहेत.