पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४६ दाक्षि. उत्तरखंड सृष्टिखंड भूमिखंड घातालखंड पुष्करखंड उत्तरखंड ... पुराण निरीक्षण. भूमिखंड. सृष्टिखंड भूमिखंड स्वर्गखंड पातालखंड उत्तरखंड ... स्वर्गखंड. गौड उत्तरखंड. आदिखंड भूमिखंड ब्रह्मखंड पातालखंड क्रियाखंड उत्तरखंड सृष्टिखंड भूमिखंड त्वर्गखंड पातालखंड उत्तरखंड क्रियायोगसार हे ब्रह्मखंड कांही मूळच्या पांच खंडांत नव्हतें, हें भूमिखंडांतील, गौड पाद्मोत्तरखंडांतील व नारदपुराणांतील खंडविभागांवरून कळून येईल; मग हैं ब्रह्मखंड आले कोठून ? याविषयी थोडासा विचार करूं. + ब्रह्मखंडांत एकंदर २६ अध्याय व १०६८ श्लोक आहेत; यांत वैष्णव- मताचे विषय आहेत. यास ' स्वगत्तरखंड : ही म्हटलेले आहे. 'स्वर्गी- तरमिमं सम्यक् श्रुत्वा स्वर्गात्तरं व्रजेत् . याच्या २६-४२ श्लोकांत यास ब्रह्मखंड म्हटलेले नाही. शेवटी ' स्वर्गात्तरापरनामकं ब्रह्मखंड संपूर्णम्' असें म्हटलेलें आहे. हा मूळच्या पद्मपुराणाचा भाग नसून नंतर वैष्णवमतप्रचाराच्या वेळी कोणी तरी यास जोडिला असावा. स्वगत्तर या नांवावरूनच, ही स्वर्गखंडाची पुरवणी करून जोडिली आहे हे उघड होतें; शिवाय, चौथ्या पाताळखंडाच्या प्रारंभीं जी वाक्यें आहेत, त्यांवरून एके काळी याचें अस्तित्व बिलकुल नव्हतें हैं सिद्ध होते. पहा:- पाताळ- खंडारंभी म्हणतात कीं: - श्रुतं सर्वे महाभाग स्वर्गखंडं मनोहरम् । ४-१-२. यांत ' स्वर्गोत्तरं मनोहरं 'अगर' ब्रह्मखंडं मनोहरं असें बिलकुल म्हटलेले नाही. यावरूनच हे ब्रह्मखंड प्रक्षित आहे हे कळून येईल.