पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/६५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. चतुर्विंशैकादशीनां माहात्म्यं पृथगीरितम् ॥ विष्णुधर्मसमाख्यानं ऋविष्णुनामसहस्रकम् । कार्तिकवतमाहात्म्यं माघस्नानफलं ततः ॥ जंबुद्वीपस्य तीर्थानां माहात्म्यं पापनाशनम् । साभ्रमत्याश्च माहात्म्यं नृसिंहोत्पत्तिवर्णनम् ॥ देवशर्मादिकाख्यानं गीतामाहात्म्यवर्णने । भक्ताख्यानं च माहात्म्यं श्रीमद्भागवतस्य ह ॥ इंद्रप्रस्थस्य माहात्म्यं बहुतीर्थकथाचितम् । मंत्ररत्नाभिधानं च त्रिपाद्भूत्यनुवर्णनम् ॥ अवतारकथा: पुण्या मत्स्यादीनामतः परम् । रामनामशतं दिव्यं तन्माहात्म्यं च वाडव || परीक्षणं च भृगुणा श्रीविष्णोर्वैभवस्य च । इत्येतदुत्तरं खंडं पंचमं सर्वपुण्यदम् || यावरून पहातां असे आढळेल की मत्स्यपुराणांतील लक्षण व नारद- पुराणांतील अनुक्रमणी यांप्रमाणें प्रचलित पद्मपुराणांत सर्व विषय आहेत; परंतु पूर्वीचा मूळ खंडविभाग हल्लीं बदलून गेलेला आहे. प्रचलित पुराणावर यावरून तीनचार संस्कार झालेले आहेत असें सहज कळून येईल. ( १ ) पहिल्या संस्करणांत पद्मपुराणांत प्रथम दाखविलेली पुष्कर आदि ५०

  • श्रीशंकराचार्यांनी विष्णुसहस्रनामभाष्यांत व सनत्सुजातीयभाष्यांत पाद्म-

पुराणांतील उतारे घेतलेले आहेत, इतकेंच नव्हे तर या पुराणांतील वासुदेवसहस्र- नामावरही त्यांची टीका आहे. ( भागवतपुराणांचें निरीक्षण पहा )